रांची: बिहारचे माजी मुख्यमंत्री हे प्रकरणी झालेल्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात जाणार असून, त्यांच्या जामिनासाठीही लवकरच उच्च न्यायालयात अर्ज केला जाईल, असे राजदचे सरचिटणीस अब्दुल बारी सिद्दीकी यांनी सांगितले. शिक्षेवरील युक्तिवादादरम्यान, ‘आपल्या अशिलाचे वय जवळपास ७५ वर्षे असून, त्यांना १७ वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले आहे, हे लक्षात घेऊन त्यांच्यावर दया दाखवावी,’ अशी विनंती लालूप्रसाद यांचे वकील देवर्षी मंडल यांनी न्यायालयाला केली होती. त्याचप्रमाणे इतर अनेक आरोपींच्या वतीनेही, हा खटला २६ वर्षे चालला असून, ही एकप्रकारे शिक्षाच आहे. त्यामुळे त्यांचे आजारपण आणि वय पाहता न्यायालयाने त्यांच्यावर दया दाखवावी, असेही सांगण्यात आले. दरम्यान, लालूप्रसाद यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. वाचा : चारा घोटाळ्यात कोषागारातून १३९.३५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी दोषी ठरलेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासह ३८ दोषींच्या शिक्षेवर सोमवारी दुपारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाने १.३० वाजेपर्यंत निर्णय राखून ठेवला होता. विशेष सीबीआय न्यायाधीश सुधांशू कुमार शशी यांनी दुपारी १२.४० वाजेपर्यंत या खटल्याचा युक्तिवाद ऐकून घेतला. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या. एस. के शशी यांनी १५ फेब्रुवारीला याप्रकरणी यादव यांच्यासह ३८ आरोपींना दोषी ठरवत शिक्षेवर सुनावणीसाठी २१ फेब्रुवारीची तारीख निश्चित केली होती. चारा घोटाळ्याप्रकरणी यादव ३० जुलै १९९७ रोजी पहिल्यांदा तुरुंगात गेले आणि १३४ दिवस न्यायालयीन कोठडीत राहिले होते. वाचा : तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेले, मात्र रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेमध्ये उपचार घेत असलेल्या यांची प्रकृती खालावली आहे. लालूंची प्रकृती गंभीर; परंतु स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. दुसरीकडे लालू यांना जामीन मिळावा म्हणून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्या जामिनासाठी लवकरच उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला जाईल, अशी माहिती राजदचे अब्दुल बारी सिद्दीकी यांनी दिली आहे. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/UyWiX6x
No comments:
Post a Comment