Breaking

Saturday, February 19, 2022

समाजवादी पक्षाचे दहशतवाद्यांशी संबंध?; केंद्रीय मंत्र्याच्या आरोपाने खळबळ https://ift.tt/LSt8rPd

नवी दिल्ली: भाजपने समाजवादी पक्षाला 'अल्पसंख्याक तुष्टीकरणाचा मित्र' आणि 'समाजविघातक' संबोधत, या पक्षाचा २००८च्या अहमदाबाद बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप शनिवारी केला. ( ) वाचा : केंद्रीय मंत्री यांनी भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन एक छायाचित्र दाखवले. यात प्रकरणातील एका आरोपीचे वडील समाजवादी पक्ष प्रमुख यांच्यासोबत दिसत होते. यावरून 'सप'चा या बॉम्बस्फोटातील सूत्रधारांशी संबंध असल्याचा आरोप ठाकूर यांनी यावेळी केला. 'भाजपने नेहमीच दहशतवादाला तीव्र विरोध केला आहे, तर 'सप' दहशतवादी कारवायांमध्ये सामील असलेल्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटांचा थेट संबंध या पक्षाच्या उत्तर प्रदेशातील नेत्यांशी होता', असे ठाकूर म्हणाले. तसेच याप्रकरणी अखिलेश यांनी उत्तर देण्याची मागणीही त्यांनी केली. उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या तोंडावर ठाकूर यांनी 'सप'चा दहशतवाद्यांची संबंध असल्याचा आरोप केला आहे. राज्यात विरुद्ध 'सप' अशी थेट लढत होत आहे. वाचा : दरम्यान, अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष न्यायालयाने शुक्रवारीच या दहशतवादी संघटनेच्या ३८ दहशतवाद्यांना फाशी आणि ११ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या स्फोटात ५६ नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर २००हून अधिक जण जखमी झाले होते. पंजाबमध्ये सर्व जागांसाठी, यूपीत तिसऱ्या टप्प्यातील मतदान पंजाब विधानसभेच्या सर्व म्हणजे ११७ जागांसाठी आज रविवारी मतदान होत असून, त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तर, उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यात विधानसभेच्या ५९ जागांसाठीही आज, रविवारी मतदार आपला कौल देतील. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेस, आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दल-बसप आघाडी, भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडी, संयुक्त समाज मोर्चा यांच्यात बहुरंगी लढत होत आहे. मात्र त्यात मुख्य सामना सत्ताधारी काँग्रेस व आप यांच्यात होईल, अशी अटकळ आहे. दिल्लीच्या सीमेवर दीर्घ काळ चाललेल्या शेतकरी आंदोलनात पंजाबमधील विविध शेतकरी संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यांची एकत्रित आघाडी असलेला संयुक्त समाज मोर्चा या निवडणुकीवर किती प्रभाव पाडतो यावरही निकाल काही प्रमाणात अवलंबून राहील. या निवडणुकीत एकूण एक हजार ३०४ उमेदवार रिंगणात असून, २.१४ कोटींपेक्षा अधिक मतदार मतदानासाठी पात्र आहेत. उत्तर प्रदेशातील १६ जिल्ह्यांतील ५९ मतदारसंघांत आज मतदान होत असून, सात टप्प्यांतील हा तिसरा टप्पा आहे. या टप्प्यात ६२७ उमेदवार रिंगणात असून, २.१५ कोटींपेक्षा अधिक मतदार या मतदानासाठी पात्र आहेत. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/otfIeBr

No comments:

Post a Comment