नवी दिल्ली : विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले, तर प्रत्येक देशात त्याचे चाहते आढळतात. हा भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी देश असला तरी तिथेही कोहलीने आपल्या खेळाद्वारे लोकांना वेड लावले आहे. याची प्रचिती पाकिस्तान सुपर लीगच्या एका सामन्यादरम्यान पाहायला मिळाली. पाकिस्तानी चाहत्याने या पोस्टरवर पीस (शांतता) हा हॅशटॅगही नमूद केला होता. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणावामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिका आयोजित केल्या जात नाहीत. ना भारतीय संघ पाकिस्तानला जातो, ना पाकिस्तानचा संघ भारतात येतो. दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. त्यामुळेच चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमधील सामने क्वचितच पाहायला मिळतात. गेल्या वर्षी पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे समारोसमोर आले होते. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. पहिल्यांदाच पाकिस्तान संघाने भारताला आयसीसी स्पर्धेत पराभूत केले होते. या आधी झालेल्या आयसीसी स्पर्धांच्या सर्व सामन्यात भारत पाकिस्तान विरुद्ध अजिंक्य राहिला होता. दरम्यान, विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये आतापर्यंत ७० शतके झळकावली आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने जवळपास प्रत्येक देशात शतक झळकावले आहे. दोन्ही देशातील अनेक क्रिकेटप्रेमी उभय देशांतील स्पर्धा सुरू व्हाव्यात याची वाट पाहत आहेत. खेळाद्वारे दोन्ही देशांतील संबंध सुधारता येतील, असे काहीजणांचे म्हणणे आहे. बीसीसीआयने मात्र आतापर्यंत पाकिस्तानबरोबर खेळायचे की नाही, याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. बीसीसीायने हा निर्णय भारताच्या सरकारवर सोपवलेला आहे, त्यांनी हिरवा कंदील दिल्यावर बीसीसीआय सामने खेळण्यास तयार आहे. भारतीय संघाचा महान फलंदाज विराट कोहलीचे चाहते फक्त भारतातच नाही, तर जगभरात पसरले आहेत. याचे ताजे उदाहरण नुकतेच पाकिस्तान सुपर लीग दरम्यान पाहायला मिळाले. पीएसएलच्या एका सामन्यादरम्यान पाकिस्तानी चाहत्याने विराट कोहलीचे पोस्टर आणले होते. पाकिस्तानमध्ये शतक झळकावताना तुला पाहायचे आहे, असे त्या पोस्टरवर लिहले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Vw7I2Qx
No comments:
Post a Comment