औरंगाबाद: राज्यमंत्री पद मागत होतो, पण प्रत्यक्षात चक्क कॅबिनेट मंत्रीपद मिळाले, असं म्हणत राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री यांनी भरसभेत आपली 'मन की बात' उघड केली. तसेच पैठण तालुक्याला पहिल्यांदाच कॅबिनेट मिळाले असल्याचं सुद्धा यावेळी भुमरे म्हणाले. पैठणच्या तारू पिंपळवाडी येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना भुमरे म्हणाले, 'आपण मागत होतो राज्यमंत्री,पण मिळाले कॅबिनेट मंत्रिपद, पैठण तालुक्याला आतापर्यंत कधीही कॅबिनेट मंत्रीपद मिळाले नव्हते. राज्यमंत्र्यांला कॅबिनेटच्या मंत्रिमंडळात बसायचा अधिकार नाही. महाराष्ट्रात एकूण ३० कॅबिनेट मंत्री आहेत. तर मराठवाड्यात शिवसेनाचा मी एकमेव कॅबिनेट मंत्री असल्याचं भुमरे म्हणाले. त्यामुळे हे पद शोभेची वस्तू नसून, या पदाचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना व्हायला पाहिजे, असेही भुमरे म्हणाले. 'त्या' बहुचर्चित रस्त्याचे चौपदरीकरण तब्बल सात-आठवेळा उद्घाटन होऊनही आणि बहुचर्चित असलेल्या औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरणाचे टेंडर मार्चमध्ये निघणार असल्याची माहिती यावेळी संदीपान भुमरे यांनी दिली आहे. या कामाचे डीपीआर तयार झाले असून, टेंडर निघाल्यावर कामाला सुरवात होईल. ज्यात बिडकीन,ढोरकीन,गेवराई या तीन गावात बायपास असणार असून, चित्तेगाव नक्षत्रवाडी,कांचनवाडी याठिकाणी पूल टाकले जाणार असल्याचे भुमरे म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/utyQgfP
No comments:
Post a Comment