ठाणे: सध्या रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine War) मध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. सध्या सगळीकडे चिंताजनक वातावरण पसरले असताना दुसरीकडे मात्र युक्रेन येथे शिक्षणासाठी ठाणे जिल्ह्यातील तब्बल आहेत. त्यामध्ये ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुरबाड, अंबरनाथ, नवीमुंबई, मीरा भाईंदर, बोरिवली, भिवंडी, पडघा, नेरुळ या भागातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या मध्ये प्रामुख्याने वैद्यकीय (एमबीबीएस) क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा समावेश असून युक्रेन मधील विविध भागातील युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थांना सुखरूप भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु असून अद्याप विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (38 students from district are stranded in Ukraine) क्लिक करा आणि वाचा- रशिया-युक्रेन दरम्यान युद्धाची सुरुवात झाल्यानंतर १६ हजारांहून अधिक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. या १६ हजार भारतीयांमध्ये ठाणे जिल्ह्यातील शिक्षण घेण्यासाठी युक्रेन येथे गेलेल्या ३८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी हे प्रामुख्याने वैद्यकीय (एमबीबीएस) शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. सध्या युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी हे बंकर आणि युनिव्हर्सिटीमध्ये आश्रित आहेत. या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप आपल्या मायभूमीमध्ये आणण्यासाठी भारत सरकारकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र युक्रेन येथील इंडियन अँबेसि कडून त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही सूचना न मिळाल्याने ते आहे त्याच ठिकाणी अडकून पडले असल्याचे विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- अडकलेले विद्यार्थी हे भीतीच्या सावटाखाली असून आता त्यांच्या जवळील पैसे देखील संपले आहेत. सध्या युक्रेन येथे रशियाकडून झालेल्या बॉम्बबारी नंतर त्या ठिकाणी लाईट सेवा, एटीएम सेवा, बँक सेवा, मॉल सारखे सुपर मार्केट सेवा ठप्प आहे. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याचा आणि उदर्निवाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या तरी हे सर्व विद्यार्थी युक्रेन येथे सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना भारत सरकारने लवकरात लवकर भारतात सुखरूप घेऊन यावे अशी विनंती विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. या संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे. क्लिक करा आणि वाचा- युक्रेनमध्ये अडकलेले ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थी ठाणे शहर (१८ विद्यार्थी) १. चैत्राली संजगिरी, २. लक्ष संजगिरी, ३. मृण्मयी ज. शेळके, ४. सत्यम महाजन, ५. मृण्मयी प. शेळके, ६. देवर्शी गायकर, ७. मिरजाम पिंगळे, ८. किंजल कांबळे, ९. करीना पाटील, १०. यश पाल, ११. रितिका जोशी, १२. आयुषी बनसोडे, १३. ओबैदूररेहान महम्मद खान, १४. रितिका राठी, १५. गायत्री सिंग, १६. प्रिया शालू, १७. अंश खास, १८. अनुषा यादव भिवंडी शहर (५ विद्यार्थी) १. संतोष चव्हाण, २. धीरज पारधी, ३. युवराज झाला, ४. हनी कुमार, ५. मुस्कान शेख नवी मुंबई (४ विद्यार्थी) १. प्रथम सावंत, २. हिमानी ठाकूर, ३. दक्ष कानडे, ४. संगम शॉव मीरा भाईंदर (४ विद्यार्थी) १. तन्वी कोर्लेकर, २. साई रपोले, ३. अनिकेत देसले, ४. फ्रांसिया डिसोझा मुरबाड १. शुभम म्हाडसे, कल्याण १. रितिक ठाकरे, २. हेमंत चेहरे, डोंबिवली ३. संकेत पाटील
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/QA0thGP
No comments:
Post a Comment