Breaking

Saturday, February 26, 2022

युक्रेनमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी अडकले?; पाहा यादी! https://ift.tt/NWywhAU

मुंबई: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. काल रात्री रोमानियाहून एअर इंडियाचे पहिले विमान युक्रेनमध्ये अडकलेल्या २१९ विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईत दाखल झाले. तसेच आणखी ३०० विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे दुसरे विमान रोमानियाहून भारताकडे रवाना झाले आहे. युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेले महाराष्ट्रातील सुमारे १ हजार २०० विद्यार्थी अडकले असून त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. (how many students from which district of the state got stuck in ukraine see list) क्लिक करा आणि वाचा- राज्य सरकारकडून हेल्पलाईन जारी यूक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले महाराष्ट्रातील अंदाजे १ हजार २०० विद्यार्थी अडकल्याची माहिती हाती आली आहे. ही माहिती राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ३०० विद्यार्थ्यांचा आपल्या पालकांशी संपर्क झाला असल्याचे सरकारने सांगितले आहे. तसेच राज्य नियंत्रण कक्ष या विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून विद्यार्थ्यांसह इतर नागरिकांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे. क्लिक करा आणि वाचा- या बरोबरच युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती राज्याचा नियंत्रण कक्ष 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर, तसेच व्हॉट्सॲप क्रमांक 9321587143 आणि controlroom@maharashtra.gov.in या ईमेलवर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्हास्तरावर देखील हेल्पलाईन क्रमांक जाहीर केलेले आहेत, असेही विभागाने जाहीर केले आहे. क्लिक करा आणि वाचा- पाहा, युक्रेनमध्ये कोणत्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी अडकले! १. पुणे – ७७ २. नांदेड – २९ ३. लातूर – २८ ४. रायगड – २६ ५. अहमदनगर – २६ ६. ठाणे – ११ ७. उस्मानाबाद – ११ ८. सोलापुर – १० ९. जळगाव – ९ १०. रत्नागिरी – ८ ११. अमरावती – ८ १२. पालघर – ७ १३. जालना – ७ १४. सातारा – ७ १५. नाशिक – ७ १६. औरंगाबाद – ७ १७. सिधुदुर्ग – ६ १८. परभणी – ६ १९. बुलडाणा – ६ २०. चंद्रपूर – ६ २१. कोल्हापूर – ५ २२. जळगाव – ५ २३. नागपूर – ५ २४. अकोला – ४ २५. भंडारा – ४ २६. गोंदिया – ३ २७. बीड – २ २८. यवतमाळ – २ २९. गडचिरोली – २ ३०. गडचिरोली – २ ३१. हिंगोली – २ ३२. वर्धा – १ ३३. धुळे – ०


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/UgzADx5

No comments:

Post a Comment