Breaking

Saturday, February 26, 2022

मोठा दिलासा; राज्यात आज करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट https://ift.tt/eOl5MgK

मुंबई: राज्यात करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होत असून आज ती ९०० च्या खाली घसरल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आज मृत्युसंख्येतही मोठी घट झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासात ८९३ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज राज्यात एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात १ हजार ७६१ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच राज्यात आज एकूण ७ हजार ८११ रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरू आहेत. (maharashtra registered 893 new cases in a day with 1761 patients recovered and 08 deaths today) राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख ०९ हजार ०१५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०२ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ७७ लाख ४४ हजार ५७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ६४ हजार ५१६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १०.१२ टक्के इतके आहे. सध्या राज्यात १ लाख ४० हजार ९४२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. क्लिक करा आणि वाचा- याबरोबरच, राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४३ हजार ६९५ इतकी आहे. मुंबईत आज ८९ नवे रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आज शनिवारी ८९ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर, मुंबईतील एकूण बरे झालेल्या करोना बाधित रुग्णांची संख्या १० लाख ३५ हजार ८२६ इतकी झाली आहे. तसेच मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये एकाही करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर, आजपर्यंत मुंबईत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजार ६९१ इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- ठाणे जिल्ह्यात आज एकूण ४६ नवे रुग्ण ठाणे जिल्ह्यात आज शनिवारी ४६ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी ठाण्यात ०६, ठाणे महापालिका क्षेत्रात २१, नवी मुंबई मनपा क्षेत्रात ११, कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात ०४, तर उल्हासनगर मनपा क्षेत्रात ०२, भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रात ०१, मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रात ०१ रुग्ण आढळले आहेत. क्लिक करा आणि वाचा- तर, पालघरमध्ये आज ०६ रुग्ण आढळले असून, वसई विरार मनपा क्षेत्रात ०७, रायगडमध्ये २४ आणि पनवेल मनपा क्षेत्रात ०८ नवे रुग्ण आढळले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/oFE9pDl

No comments:

Post a Comment