Breaking

Sunday, February 20, 2022

हिटमॅन रोहितच्या नेतृत्वाची कमाल; वनडे पाठोपाठ टी-२० मालिकेत वेस्ट इंडिजाचा क्लिन स्वीप https://ift.tt/QgJhB1K

कोलकाता: कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा १७ धावांनी पराभव केला आणि मालिका ३-०ने जिंकली. भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १८४ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल वेस्ट इंडिजला ९ बाद १६७ धावा करता आल्या. वेस्ट इंडिजला भारत दौऱ्यात एकही मॅच जिंकता आली नाही. याआधी त्यांचा वनडे मालिकेत ३-० असा पराभव झाला होता. संपूर्ण मालिकेत शानदार फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. वाचा- भारताने दिलेल्या १८५ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका बसला. दीपक चहरने पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर विकेट घेतली. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने शाई होपला बाद करत आणखी एक धक्का दिला. वेस्ट इंडिजने २६ धावात दोन विकेट गमावल्या होत्या. निकोलस पूरन आणि पॉवेल यांनी आक्रमक फलंदाजी केली आणि संघाला अर्धशतकाच्या पुढे नेले. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत असताना हर्षल पटेलने पॉवेलला २५ धावांवर बाद केले. त्या पाठोपाठ वेंकटेश अय्यरने कर्णधार कायरन पोलार्डला फक्त ५ धावांवर माघारी पाठवले. ११व्या षटकात अय्यरने धोकादायक जेसन होल्डरला बाद करून मोठी विकेट मिळवली. होल्डर बाद झाला तेव्हा वेस्ट इंडिजने ८७ धावा केल्या होत्या. वाचा- मोडला हर्षलने रोस्टन चेसला बाद केले. वेस्ट इंडिजने १०० धावात ६ विकेट गमावल्या होत्या. पण एका बाजूने निकोलस पूरनची धमाकेदार फलंदाजी सुरूच होती. त्याला शार्दुल ठाकूरने १८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले. पूरनने ४७ चेंडूत ६१ धावा केल्या. त्यानंतर १९व्या षटकात आक्रमक फलंदाजी करणाऱ्या रोमॅरियो शेफर्डला हर्षलने माघारी पाठवले. अखेरच्या षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी २३ धावांची गरज होती. भारताकडून हे षटक शार्दुलने टाकले. वेस्ट इंडिजला अखेरच्या षटकात २३ धावा करण्याची कमाल करता आली नाही. भारताकडून हर्षलने सर्वाधिक ३ तर दीपक चहर, वेंकटेश अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. वाचा- त्याआधी सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ५ बाद १८४ धावसंख्या उभी केली. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. टीम इंडियाने या सामन्यात ४ बाद केले होते. भारताकडून आवेश खानने टी-२० मध्ये पदार्पण केले. या सामन्यात विराट कोहली, ऋषभ पंत, यजुवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती देण्यात आली. भारतीय डावाची सुरुवात ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांनी केली. पण ही जोडी फार धावा करू शकली नाही. ऋतुराज फक्त ४ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने ईशानसोबत अर्धशतकी भागिदारी केली. ही जोडी श्रेयस बाद झाल्याने फुटली. त्याने १६ चेंडूत २५ धावा केल्या. त्या पाठोपाठ ईशान देखील ३४ धावांवर माघारी परतला. यामुळे भारताची अवस्था ३ बाद ६६ अशी झाली. श्रेयस आणि ईशान माघारी परतल्यावर रोहित आणि ही जोडी मैदानात होती. भारताने तेव्हा १० षटकात फक्त ६८ धावा केल्या होत्या. ७ धावा करून माघारी परताल. तो बाद झाला तेव्हा भारताने १३.५ षटकात फक्त ९३ धावा केल्या होत्या. रोहितच्या जागी आलेल्या वेंकटश अय्यरने सूर्यकुमार सोबत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांनी षटकारांचा पाऊस पाडला. अखेरच्या षटकात सूर्यकुमारने अर्धशतक पूर्ण केले. त्याने त्याने ३१ चेंडूत ७ षटकार आणि १ चौकारासह ६५ धावा केल्या. डावाच्या अखेरच्या चेंडूवर बाद सूर्यकुमार बाद झाला. तर वेंकटेशने १९ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकारांसह ३५ धावा केल्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/K3hUPV5

No comments:

Post a Comment