Breaking

Wednesday, February 16, 2022

कोहली आणि पंत झटपट बाद झाल्यावर डाव सावरणाऱ्या सूर्यकुमारने विजयाचे सांगितले एकमेव कारण, म्हणाला... https://ift.tt/VXwMr52

कोलकाता : बिनबाद ६४ वरून भारताची ४ बाद ११४ अशी स्थिती झाली होती. विराट कोहली आणि रिषभ पंत झटपट बाद होते. त्यानंतर एकही अनुभवी फलंदाज शिल्लक नव्हता. पण तरीही भारताला विजय साकारून दिला तो सूर्यकुमार यादवने. भारतीय संघ अडचणीत सापडला असताना सूर्यकुमारने १८ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ३५ धावांची तुफानी खेळी साकारली. सामना संपल्यावर सूर्यकुमार यादवने विजयाचे एकमेव कारण सांगितले आहे. विजयासाठी कोणती गोष्ट महत्वाची ठरली, पाहा...सामना संपल्यावर सूर्यकुमार यादव म्हणाला की, " रिषभ पंत आणि मी जेव्हा खेळत होतो तेव्हा आमचे हेच बोलणे सुरु होते की, चेंडू हा वेगाने बॅटवर येत आहे. त्यामुळे लेग स्टम्पवर किंवा ऑफ साइडच्या बाहेर चेंडू पडला तर त्या चेंडूवर चांगल्या टायमिंगने फटका मारायला हे मी ठरवले होते आणि ती गोष्ट या सामन्यात माझ्याकडून घडली. मी कोणत्याही स्थानावर फलंदाजी करू शकतो, एकाच स्थानावर फलंदाजी करण्यासाठी मला पाठवावे, असे मला कधीच वाटत नाही. कारण तसा बदल मी माझ्या फलंदाजीत करत असतो. हा सामना कसा लवकर संपवता येईल, याचा विचार मी करत होता. अखेरपर्यंत खेळपट्टीवर राहायचे आणि संघाला विजय मिळवून द्यायचा, ही एकच गोष्ट डोक्यात होती. जेव्हा वेंकटेश फलंदाजीला आला तेव्हा चेंडू आणि धावा यामध्ये फक्त आठचा फरक होता. त्यावेळी मी त्याला सांगितले की, कोणतेही जोखीमभरे फटके खेळू नकोस. फक्त चांगले आणि योग्य फटकेच मारत राहा. वेंकटेशनेही चांगली फलंदाजी केली, त्याच्या फलंदाजीचाही मला आनंद आहे. वेस्ट इंडिजच्या फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली. या खेळपट्टीवर चेंडू जास्त वळत नव्हते, पण तरीही त्यांनी चांगला टप्पा आणि दिशा ठेवली होती. पण १०-१२ षटकांनंतर आमच्यासाठी सामना सोपा झाला. कारण १०-१२ षटकांनंतर मैदानात दव पडायला सुरुवात झाली. दव पडायला लागल्यावर फिरकीपटूंना चेंडू ग्रिप करणे जमत नव्हते, चेंडू त्यांच्या हातून सटकत होता. दुसरीकडे चेंडू बॅटवर चांगला येत होता. त्यामुळे दवाचा यावेळी आम्हाला चांगलाच फायदा झाला."


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/gzmWOc9

No comments:

Post a Comment