चंद्रपूर : स्वच्छतेसाठी चंद्रपूर महानगरपालिकेला थ्री स्टार मिळाले, याचा मोठा गाजावाजा झाला, मात्र हे थ्री स्टार केवळ नावाचेच होते, याचा प्रत्यय आज चंद्रपूरवासियांना आला. वार्डातील दुर्गंधी दूर करा ही मागणी लावून धरीत आज इंदिरा नगरवासियांनी महानगरपालिकेसमोर ठिय्या मांडला. काही महिन्यापूर्वीच चंद्रपूर शहराला स्वच्छतेसाठी थ्री स्टार मिळाले. प्रदुषित शहर असले तरी शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी महानगर पालिका दक्ष आहे. हे बघून शहरवासीय सूखावले. मात्र या थ्री स्टारची पोलखोल करणारा प्रकार आज पुढे आला. चक्क वार्डातील घाण, दुर्गंधी दूर करा अशी मागणी लावून धरत वार्डवासियांनी पालिकेसमोर ठिय्या मांडला. चंद्रपूर शहरातील इंदिरा नगर परिसरातील नाल्याचे बांधकाम आणि नगरात पसरलेली दुर्गंधी दूर झाली पाहीजे, या मागणीचं निवेदन इंदिरा नगरवासियांनी दिलं. त्यावेळी प्रशासनानं नागरिकांना आठ दिवसात समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेनं समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केलं. समस्या जैसे थे आहे. त्यामुळं संतापलेल्या इंदिरा नगरवासियांनी आज महानगरपालिकेसमोर ठिय्या केलं. नगरात नाल्यांचे बांधकाम करा तसेच दुर्गंधी, घाण दूर करावी अशी मागणी केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Ghbv1yD
No comments:
Post a Comment