Breaking

Thursday, February 17, 2022

कर्णधार असावा तर असा... अपयशी ठरल्यावर इशान किशनचा मोठी समस्या सोडवली, पाहा नेमकं काट घडलं होतं... https://ift.tt/wHU4FCx

कोलकाता : कर्णधार हा खेळाडूंवर ओरडणारा नाही तर त्यांना समजून घेणारा असायला हवा. अपयश आल्यानंतरही त्यामधून मार्ग कसा काढायचा, हे कर्णधाराने खेळाडूंना सांगायला हवं आणि याचा उत्तम वस्तुपाठ हा रोहित शर्माने पहिल्या सामन्यानंतर दाखवून दिला. पहिल्या सामन्यानंतर नेमकं घडलं तरी काय, पाहा... वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात इशान किशनला सलामी करण्याची संधी देण्यात आली. पण तो त्यामध्ये अपयशी ठरला, कारण त्याला ४२ चेंडूंत फक्त ३५ धावाच करता आल्या. पण रोहितने यावेळी इशानवर टीका केली नाही किंवा त्याच्यावर ओरडला नाही, तर रोहितने यावेळी त्याची चांगली शिकवणी घेतली आणि त्याला चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. रोहित सामना संपल्यावर मैदानात इशानबरोबर बोलत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावेळी रोहित इशानला फलंदाजीबाबत काहीतरी सांगत असल्याचे समजत होते. पण रोहित नेमकं करतो तरी काय, हे मात्र कोणाला कळत नव्हते. पण रोहितने यावेळी या गोष्टीचा खुलासा केला आहे. रोहितने सांगितले की, " मी यापूर्वीदेखील इशानशी याबाबत चर्चा केली आहे. चेन्नईमध्ये खेळत असताना खेळपट्टी ही संथ झाली होती आणि त्यावेळी फलंदाजी करताना इशानला समस्या जाणवत होती. पण त्यावेळी इशान मधल्या फळीत खेळत होता. पण या सामन्यात मात्र तो सलामीला आला होता. सामना संपल्यावर मी त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून पुढच्यावेळी जर अशी परिस्थिती आली तर तो यामधून मार्ग काढू शकतो. इशान आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत जास्त सामने खेळलेला नाही. भारताकडून खेळताना नेहमीच जास्त दबाव असतो. त्यामुळे मी त्याच्याशी स्ट्राइक रेट रोटेट करण्याबाबत चर्चा केली. मला आशा आहे की, या गोष्टीचा फायदा त्याला नक्कीच होईल." संथ खेळपट्टीवर चेंडू वेगाने बॅटवर येत नाही. त्यावेळी आक्रमकपणे फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंसाठी फटकेबाजी करणे सोपे नसते. हीच समस्या इशानलाही जाणवत होती. पण सामना संपल्यावर मात्र रोहितने इशानची ही समस्या दूर केली आहे..


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KQ6LJia

No comments:

Post a Comment