Breaking

Monday, February 28, 2022

८०० कोटी गेले कुठे?; भाजप आमदाराचा शिवसेनेला सवाल https://ift.tt/YNOrs1l

दिवा: कल्याण-डोंबिवली पाठोपाठ आता दिव्यात ही सेना-भाजपमध्ये जोरदार राजकारण सुरू झाले आहे. त्यातच शिवसेनेने दिव्यात आणि राष्ट्रवादीला खिंडार पाडत आपली ताकद पुन्हा दाखवून दिली आहे. दरम्यान दिव्यातील विकासकांमावरून सेना भाजपमध्ये आरोप-प्रत्योरोपांच्या फेरी सुरू झाल्या आहेत. भाजप आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेला लक्ष्य करत सांगितले की, दिवेकरांनी शिवसेनेला भरभरून मते दिली. परंतु, दिवेकरांचा विश्वासघात केला असेल तर तो शिवसेनेने केला. शिवसेनेचे सर्व आठ लोकप्रतिनिधी या ठिकाणाहून निवडून गेले आहेत. पण साधे वॉटर मिटरसाठी निधी आला तो कुठे गेला याता काहीच पत्ता नाही. हे ८०० कोटी कुठे गेले याचे प्रथम त्यांनी उत्तर द्यायला हवे. यालाच आता शिवसेनेकडून उत्तर देण्यात आले आहे. (In BJP and are shifting the on each other) क्लिक करा आणि वाचा- ठाणे महापालिकेची निवडणूक येत्या काळात कधीही लागू शकते. म्हणून शिवसेनेने निवडणूकपूर्व तयारी सुरू केली आहे. यातच भाजप आणि राष्ट्रवादीचे जवळपास ५०० पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेनेने आपल्या पक्षात घेतले आहेत. दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा प्रवेश करण्यासाठी शिवसेनेने मेळावा भवरला होता. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक, शहरप्रमुख आणि माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी भाजप आमदार संजय केळकर यांना टोला हाणला आहे. ते वयाने आणि पदाने मोठे आहेत, मी त्यांच्या सन्मान करतो. पण कोणत्याही विषयावर बोलताना त्यांनी माहिती घेऊन बोले पाहिजे. त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती गेली असावी. त्यामुळे चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांनी वक्तव्य केले आहे. क्लिक करा आणि वाचा- दिव्यात भाजप-राष्ट्रवादीला खिंडार.... दिव्यातील नेते निलेश पाटील आणि अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश शिवसेनेने आपल्या पक्षात करून भाजपला खिंडार पाडले आहे. तसेच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सुद्धा दिव्यात खिंडार पाडत शिवसेनेने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रवेश दिला आहे. दरम्यान, या प्रवेशावेळी नगरसेवक रमाकांत मढवी, नगसेविका दर्शना म्हात्रे, चरण म्हात्रे, निलेश पाटील, अर्चना पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BVCT5Jk

No comments:

Post a Comment