Breaking

Thursday, February 24, 2022

मोदींची पुतीन यांच्याशी २५ मिनिटं चर्चा; युक्रेनवरील हल्ल्याबाबत थेटच बोलले! https://ift.tt/Z5Crloq

नवी दिल्ली: आणि या दोन देशांत युद्ध भडकल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. त्यात भारताचे यांनी गुरुवारी रात्री उशिरा रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्याशी फोनवरून चर्चा केली व युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी आवाहन केले. ( ) वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात जवळपास २५ मिनिटे चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक राहिली. युद्धाने कोणतेही प्रश्न सुटू शकत नाहीत, असे नमूद करतानाच युक्रेनमधील हिंसाचार तत्काळ थांबला पाहिजे व तिथे शांतता प्रस्थापित व्हायला हवी, असे आवाहन मोदी यांनी या चर्चेदरम्यान पुतीन यांना केल्याचे सांगण्यात आले. असेल तर त्यावर युद्ध हा पर्याय असू शकत नाही. चर्चेतून हा वाद मिटवला पाहिजे, असे मोदी यांनी पुतीन यांना सांगितले. युक्रेनमध्ये भारतीय नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. त्यांना तिथून सुरक्षितपणे मायदेशी आणण्याचे आव्हान आहे. यावर मोदी यांनी पुतीन यांच्याशी विस्ताराने चर्चा केली. त्याला पुतीन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पुतीन यांनी एकंदर स्थितीबाबत पंतप्रधान मोदी यांना अवगत केले तसेच ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्यावर पुढे अधिक विचारमंथन करण्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. भारत आणि रशिया या दोन देशांत मैत्रीचे संबंध राहिले आहेत. त्याआधारावर दोन्ही नेत्यांमधील चर्चा अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरली. वाचा : दरम्यान, पुतीन यांच्याशी चर्चा करण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी युक्रेन संकटावर एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. युक्रेनमधील स्थितीचा आढावा घेऊन तिथे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे कसे बाहेर काढायचे, याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानेही याबाबत माहिती दिली होती व मोदी हे पुतीन यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले होते. युक्रेनमध्ये सुमारे २० हजार भारतीय नागरिक अडकले आहेत तर चार हजार नागरिक तिथून निघाले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पोलंड आणि हंगेरीमार्गे माघारी आणण्याची योजना असल्याचेही सांगण्यात आले. युक्रेनचं हवाईक्षेत्र बंद असल्याने या पर्यायाचा विचार करण्यात आला आहे. दुसरीकडे भारतीय दूतावासही अलर्ट मोडवर असून भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वेगवान पावले तिथे टाकली जात आहेत. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/D6aSHQh

No comments:

Post a Comment