Breaking

Thursday, February 24, 2022

रशिया-युक्रेन युद्ध; रत्नागिरी जिल्हा प्रशासनानेही उचलले 'हे' पाऊल https://ift.tt/XdrcOvU

रत्नागिरी: Rassia) व (Ukraine) या देशांमध्ये युद्ध सुरू झाले असून युक्रेन या देशात भारतीय नागरिक व विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्याचे प्रयत्न भारत सरकारने सुरू केले आहेत. देशातील अनेक राज्यांमधील नागरिक तसेच विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. हे लक्षात घेता रत्नागिरी जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हयातील कोणी भारतीय नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्यास त्यांच्या सहाय्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलाय. ( ratnagiri district administration released helpline) रत्नागिरी जिल्ह्यातील कोणतेही नागरिक, विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी सुशांत खांडेकर यांनी कळविले आहे. क्लिक करा आणि वाचा- जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी फ्रोन 02352-226248/ 222233ईमेल- controlroomratnagiri@gmail.com युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांनी किंवा विद्यार्थ्यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाने दिलेल्या फोन क्रमांकावर किंवा ईमेल आयडीवर संपर्क करावा असे आवाहन रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या बरोबरच नवी दिल्ली येथे नागरिकांसाठी हेल्पलाईन्स स्थापन करण्यात आलेल्या आहेत. नागरिक तेथेही संपर्क साधू शकतात असे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. क्लिक करा आणि वाचा- केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्लीफ़ोन-टोल फ्री 1800118797फोन - 011-23012113/23014105 / 23017905फॅक्स 011-23088124ईमेल- situationroom@mea.gov.in रशिया आणि युक्रेन या दोन देशांदरम्यान सुरू झालेल्या युद्धामुळे व त्याच्या परिणामांकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय दूतावासाने यापूर्वी युक्रेन सोडण्यासाठी दोनवेळा ऍडव्हायजरी जारी केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलेत. रत्नागिरी जिल्हा प्रशासनानेही आपत्ती व्यवस्थापनही समन्वय साधला जावा यासाठी सज्ज झाला आहे. क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्यांनी केल्या प्रशासनाला सूचना युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांची तिथे काय व्यवस्था आहे ते पाहावे, तसेच त्यांना परत महाराष्ट्रात सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी व्यवस्थित समन्वय साधावा अशा सूचना मुख्य सचिवांना केल्या आहेत. विशेषत: महाराष्ट्रातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत त्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने प्राधान्याने केंद्राशी बोलावे अशा सूचनाही मुख्यमत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. महाराष्ट्रातून उद्योग , शिक्षण, व्यवसायनिमित्त तिथे गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/aWCqbf6

No comments:

Post a Comment