सिंधुदुर्ग: एआयएमआयए पक्षाने महाविकास आघाडीला आघाडी करण्याचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षांकडून ही शक्यता फेटाळली जात असताना दुसरीकडे विरोधकांकडून मात्र महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेवर जोरदार टीका होऊ लागली आहे. भाजपचे आमदार यांनीही या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. (bjp criticizes shiv sena and maha vikas aghadi over proposal from aimim) आमदार नितेश राणे महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टीका करताना म्हणाले की, एमआयएम हा पक्ष कट्टरतावादी पक्ष आहे. या पक्षाने नेहमीच हिंदुंबाबत टोकाची भूमिका घेतल्याचे आपण वारंवार पाहिलेले आहे. अशा या पक्षाने महाविकास आघाडीत येण्याची ईच्छा व्यक्त करत आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेसारखा हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि त्या पक्षाबरोबर जर आघाडी करण्यासाठी एमआयएम हा पक्ष तयार असेल, तर मग आता फक्त isis चा प्रस्ताव येणे काय तो बाकी राहिलेला आहे. उद्या isis वाले देखील या लोकांना प्रस्ताव देतील आणि त्यांच्या मांडीवर घेऊन बसतील. म्हणून म्हणतोय की शिवसेनेने खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात करून दाखवले आहे आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे एमआयएमचा हा प्रस्ताव आहे, अशी टीका भाजप यांनी केली. क्लिक करा आणि वाचा- 'कट्टरतावाद्यांना शिवसेना जवळची वाटू लागली आहे' नितेश राणे शिवसेनेवर टीका करताना म्हणाले की, कट्टरतावाद्यांना आता शिवसेना जवळची वाटू लागली आहे, हे आता सरळ स्पष्ट आहे. एमआयएमसारख्या कट्टरतावादी पक्षाची कुठलीही वक्तव्ये बघा, ती हिंदुत्वाच्या विरोधात आहेत. अशा पक्षाला आता शिवसेनेबरोबर युती करावी असे वाटते किंवा मग आघाडीमध्ये जावे असे वाटत असेल, तर याचा अर्थ खऱ्या अर्थाने शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये करून दाखवले आहे, असा टोलाच नितेश राणे यांनी लगावला आहे. एमआयएम आणि भाजप ही दोन टोके आहेत. एम आय एम पक्षाची नेहमी हिंदूंच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. उत्तर प्रदेश मधील ओवेसींची भाषण बघा किंवा देशभरामध्ये ओवेसी जिथे जिथे तोंड उघडतात तिथे हिंदूंच्या विरोधात आगे. जरी मतांच्या राजकारणात ते आमचं नुकसान करत असले तरी हिंदूंसाठी भाजप हा एकमेव पक्ष आहे. हिंदूंसाठी किती मोठे नुकसान करून घ्यायला भाजपला तयार आहे. क्लिक करा आणि वाचा- पाहा, व्हिडिओ- संजय राऊत यांच्यावरही साधला निशाणा संजय राऊतांना काय म्हणायचं ते म्हणू देत, त्यांची राजकीय उंची किती आहे ते येणाऱ्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये दिसेल. शेवटी संजय राऊत हा राष्ट्रवादीचा एक एजंट आहे. एजंटना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किती महत्त्व द्यायचं हे मी राजकारणी लोकांनी ठरवलं पाहिजे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/F8CMc4y
No comments:
Post a Comment