वृत्तसंस्था, नवी दिल्लीः नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना 'वाय' श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. 'वाय' श्रेणीच्या सुरक्षेअंतर्गत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) सात ते आठ कमांडोंचे अग्निहोत्री यांना २४ तास संरक्षण असेल. अग्निहोत्री दिग्दर्शित 'कश्मीर फाइल्स' हा चित्रपट दहशतवादामुळे काश्मीरमधून पलायन करणाऱ्या काश्मिरी पंडितांवर आधारित आहे. चित्रपटाचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेऊन चित्रपट दिग्दर्शकाला देशातील तिसऱ्या क्रमांकाची सुरक्षा देण्यात आली आहे. अग्निहोत्री यांनी आपला चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा केल्यानंतर हे पाऊल उचलले आहे. वाचाः 'चित्रपट सत्यापासून दूरच' श्रीनगर : 'काश्मिरी पंडितांचे स्थलांतर हा काश्मिरियतवरील डाग आहे,' असे नमूद करतानाच, 'द कश्मीर फाइल्स हा चित्रपट मात्र सत्यापासून लांबच आहे. या चित्रपटात दहशतवादाने होरपळलेल्या मुस्लिम व शीख बांधवांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष केले आहे,' अशी भूमिका नशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी मांडली. 'काश्मिरी पंडितांचे स्थलांतर घडले, तेव्हा फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री नव्हते. राज्यपालपदी जगमोहन होते. केंद्र सरकारमध्ये व्ही. पी. सिंह यांचे सरकार होते व या सरकारला भाजपचा पाठिंबा होता. हा राजकीय इतिहास या चित्रपटात का दाखवण्यात आला नाही,' असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. वाचाः
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/nrJNlFv
No comments:
Post a Comment