Breaking

Thursday, March 24, 2022

रशियावर ओढवली मोठी नामुष्की; भारताने घेतली ही भूमिका https://ift.tt/4hpkQ69

संयुक्त राष्ट्रे: महिनाभराच्या युद्धानंतरही युक्रेनकडून अद्याप कडवा प्रतिकार होत असल्याने अडचणीत आलेल्या रशियाला राजनैतिक स्तरावरही धक्के बसत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत रशियाने मांडलेला ठराव फेटाळला गेल्याने रशियावर मोठी नामुष्की ओढवली. यापूर्वी युक्रेनच्या बाजूने मांडल्या गेलेल्या ठरावावर तटस्थ भूमिका घेणाऱ्या भारताने रशियाने मांडलेल्या या ठरावातही मतदानात भाग न घेऊन आपले धोरण कायम ठेवले. ( ) वाचा : युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या मानवी गरजांच्या टंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी रशियाने हा ठराव मांडला होता. सीरिया , द. कोरिया व बेलारूस या देशांनी या ठरावास सहमती दर्शवली होती. परंतु त्यामध्ये रशियाने केलेल्या आक्रमणाचा उल्लेख नसल्याने बहुतांश सदस्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. हा ठराव मंजूर होण्यासाठी नऊ देशांनी त्याच्या बाजूने मतदान करणे आवश्यक होते. परंतु वगळता केवळ चीनने या ठरावाच्या बाजूने मतदान केले. भारतासह सुरक्षा परिषदेतील उर्वरित तेरा देशांनी या ठरावावरील मतदानापासून दूर राहणे पसंत केले. त्यामुळे हा ठराव मंजूर होऊ शकला नाही. या ठरावाच्या आडून रशिया आपले क्रौर्य व आक्रमक धोरण लपविण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीका अमेरिकेच्या प्रतिनिधी यांनी केली. रशिया आक्रमक व हल्लेखोर आहे. युक्रेनमधील मानवी गरजांच्या टंचाईचे वर्णन करताना स्वत: केलेल्या आक्रमणाचा मात्र त्यांनी उल्लेख केलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. वाचा : रशियाकडून युद्धगुन्हे यांच्या नेतृत्वाखालील रशियाने युक्रेनमध्ये युद्धगुन्हे केल्याचा आरोप अमेरिकेने केला. रशियाच्या फौजांनी मधील नागरी वस्त्यांनादेखील लक्ष्य केले, यामध्ये अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले. तसेच, रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमध्ये मोठा संहार होऊन त्यांची घडी विस्कटली. सद्यस्थितीत उपलब्ध असणाऱ्या या माहितीच्या आधारे रशियाने युद्धगुन्हे केल्याचे स्पष्ट होत आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सांगितले. रशियाने २४ फेब्रुवारीस युक्रेनवर आक्रमण केले होते. ब्रिटनकडून युक्रेनला क्षेपणास्त्रे ब्रिटनकडून युक्रेनला आणखी हजारो क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यात येणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान हे ब्रसेल्सच्या दौऱ्यावर जाणार असून ते नाटोसह अन्य नेत्यांशी चर्चा करणार आहेत. अन्य देशांनीही युक्रेनला जास्तीत जास्त शस्त्रपुरवठा करावा, असे आवाहन जॉन्सन यांनी केले आहे. अधिकाऱ्यांची हकालपट्टी मॉस्कोतील अमेरिकी दूतावासात कार्यरत असणाऱ्या अनेक अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांची रशियाने हकालपट्टी केली आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या रशियन अधिकाऱ्यांनी अमेरिकेने नुकतीच हकालपट्टी केली होती. त्यानंतर रशियाने याप्रकारे प्रत्युत्तर दिले. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ozOy4jG

No comments:

Post a Comment