म. टा. प्रतिनिधी, घरफाळ्याची थकबाकी असती तर विधानपरिषद निवडणुकीच्या छाननीमध्ये आपला उमेदवारी अर्ज बाद झाला असता, पण तसे नसल्यानेच तो अर्ज वैध ठरला, यामुळे कुणाचं तरी ऐकून विधानसभेत आपल्यावर घरफाळा चुकविल्याचा आरोप करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष (Chandrakant Patil) हे एवढे अपरिपक्व नेते असतील असे वाटले नव्हते असा टोला पालकमंत्री (Satej Patil) यांनी मारला. (guardian minister of kolhapur criticizes bjp leader chandrakant patil) भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत पालकमंत्री पाटील यांच्यावर घरफाळा चुकविल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत मंत्र्यांनी पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. पाच वर्षे ते पालकमंत्री असताना थेटपाईपलाईन योजनेसाठी काहींच न केल्याने ही योजना रखडली असा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील हे बारा वर्षे आमदार आहेत. पाच वर्षे राज्यातील पाच महत्त्वाची मंत्रीपदे त्यांच्याकडे होती. तरीही त्यांनी अतिशय अपरिपक्व नेत्याप्रमाणे आपल्यावर आरोप केले आहेत. वीस वर्षात आपण साडे अकरा कोटींचा घरफाळा कोल्हापूर महापालिकेत भरला आहे. एकही रूपया थकबाकी नसल्याचे पत्र महापालिकेने दिले आहे. तरीही माहिती न घेता पाटील यांनी खोटे आरोप केले. क्लिक करा आणि वाचा- ते म्हणाले, दहा वेळा खोटं बोलून त्याला खरं करण्याचा भाजपचा डाव आहे. तो आपण यशस्वी होवू देणार नाही. चार राज्यातील विजयाने उत्साह वाढण्याऐवजी त्यांच्यात उन्माद वाढला आहे. हा उन्माद कोल्हापूची स्वाभिमानी जनता सहन करणार नाही. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक प्रदेशाध्यक्ष पाटील यांनीच लादली आहे. त्यांच्याकडे प्रचारासाठी विकासाचा कोणताच मुद्दा नाही. त्यामुळे ते आपल्यावर खोटे आणि वैयक्तीक आरोप करत आहेत. अशी टीका करण्यापेक्षा पाच वर्षे तुम्ही काय केला हे सांगा असा सवाल करून पालकमंत्री पाटील म्हणाले, पाच वर्षात थेटपाईपलाइनसाठी काहींच केले नाही. त्यामुळे ही योजना रखडली. ही योजना पूर्ण व्हावी यासाठी आपण तळमळीने प्रयत्न करत आहे. पण करोना आणि इतर काही अडचणीमुळे त्याला विलंब लागत आहे. क्लिक करा आणि वाचा- यावेळी माजी महापौर सागर च्व्हाण, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, राजू लाटकर, सुनील मोदी, रमेश पुरेकर, मधुकर रामाणे, भूपाल शेटे, राहूल माने, भरत रसाळे, प्राचार्य महादेव नरके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zALWTB2
No comments:
Post a Comment