Breaking

Sunday, March 6, 2022

'राज्यपालांना हटवायला एक फोन बस आहे'; आव्हाड यांचे मोदींना आवाहन https://ift.tt/8tu1y2Z

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राज्यपाल (Bhagat Singh Koshyari) यांच्या विरोधात संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना या राज्यपालांना या ठिकाणावरून उचलायचे असलेल आणि तसे मनात असेल तर एक फोन बस झाला, अशी टीका राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी व्यक्त केली आहे. (minister has said that a phone call is enough to remove bhagat singh koshyari from the post of governor) राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी यांच्यात असलेला शाब्दिक वाद मिटताना दिसत नाहीये. आज पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात देखील हा वाद दिसून आला. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील खोचक प्रतिक्रिया दिली आहे. जर राज्यपालांवर मोदी काय बोलले मला माहीत नाही, मी पाहिलं नाही. परंतु त्या राज्यपालांना इथून उचलायला एक फोन बस झाला. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर खरंच प्रेम असेल, तसेच राज्यपालांनी केलेलं वक्तव्य चुकीचं वाटत असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात असेल तर मोदींसाठी फोनवरून एक मिनिटाचं काम आहे. प्रेम असेल तर त्यांनी राज्यपालांना एका मिनिटात हटवावे असे मत राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मांडले आहे. क्लिक करा आणि वाचा- तसेच ठाणे महानगर पालिकेतील महाविकास आघाडीत पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पाहायला मिळात आहे. त्याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की, आमची मुंबई येथे बैठक झाली, त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी आपण ३० वर्षे सापाच्या पिल्लाला पाळले. आता ते वळवळू लागले आहे. फुंकर मारतोय. आम्ही विष प्यायलो. त्यामुळे आता महाविकास आघाडीत एकत्र राहून लढा द्या, असे आदेश दिले. क्लिक करा आणि वाचा- मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि तुमचा विधिमंडळातील जो नेता असतो त्याचा आदेश मानायचा हा आमच्या साहेबांचा आदेश आहे. त्यामुळे आमचा इथला विधीमंडळातील नेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे आज ते म्हणतात की महाविकास आघाडी झालीच पाहिजे तर ती व्हायलाच पाहिजे, असे म्हणून आव्हाड यांनी ठाण्यात पुन्हा एकदा आगामी निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/trBShOQ

No comments:

Post a Comment