मुंबई : मुंबईकरांनो, उद्या घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक तपासा. मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी, ७ जुलै रोजी ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे काहीलोकल रद्द, काही विलंबाने धावणार आहेत. मध्य रेल्वेने रविवारी ठाणे ते दिवा आणि कुर्ला ते वाशीदरम्यान ब्लॉक जाहीर केला आहे. पश्चिम रेल्वेने वसई रोड ते विरारदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. ब्लॉक वेळेत रेल्वेरूळांसह सिग्नल व्यवस्थेची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.मध्य रेल्वेस्थानक - ठाणे ते दिवामार्ग - पाचवा आणि सहावावेळ - सकाळी १०.५० ते दुपारी ३.२०परिणाम - ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे जलद आणि धीम्या मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. लोकल फेऱ्या विलंबाने धावणार असून, १८ अप-डाउन मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावणार आहेत.आषाढी यात्रेसाठी गाड्यामध्य रेल्वेने आषाढी यात्रेसाठी ६४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामुळे विठ्ठू भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. हार्बर रेल्वेस्थानक - कुर्ला ते वाशीमार्ग- अप आणि डाऊनवेळ - सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०परिणाम - सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशीदरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. पश्चिम रेल्वेस्थानक - वसई रोड ते विरारमार्ग - अप आणि डाऊन धीमावेळ - शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.१५ ते रविवारी पहाटे ४.१५परिणाम - ब्लॉक वेळेत रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. धीम्या मार्गावरील काही लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/g95Zc0n
No comments:
Post a Comment