Breaking

Monday, March 21, 2022

'कोण एमआयएम?, कुठून उपटला माहीत नाही'; मंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला टोला https://ift.tt/dlAB6y0

ठाणे: उत्तर प्रदेश येथे पार पडलेल्या निवडणुकानंतर सगळी राजकीय गणित बदलताना दिसत आहेत. त्यातच आता आगामी निवडणुका लक्षात घेता पक्ष कडून महाविकास आघाडीमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे तथा ठाणे गडचिरोलीचे पालकमंत्री यांनी स्मितहास्य देत टोला लगावत कोण एमआयएम?, कुठून उपटला माहीत नाही. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ठाण्यातील किसननगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी महाराजांची पालखी देखील पालकमंत्री यांनी खांद्यावर घेतली होती. या भव्य मिरवणुकीसाठी पालकमंत्री मान्यवर म्हणून उपस्थित होते. ( eknath shinde has criticized party) एकीकडे उत्तरप्रदेशच्या निवडणुका असतील किंवा आता येऊ घातलेल्या आगामी निवडणुका असतील सध्या राजकीय चित्र बदलताना दिसत आहेत. या आगामी निवडणुकांमध्ये आघाडी करावी, असा प्रस्ताव 'एमआयएम'चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे केली होती. मात्र कोण एमआयएम कुठून उपटला माहित नाही असा टोला राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मितहास्य देत एमआयएमला लगावला आहे. एमआयएमला ज्या पक्षात त्यांना जायचं आहे त्या पक्षाचे प्रमुख आणि कार्यकर्ते त्यांना घ्यायला तयार नाहीत. फक्त मला जायचं आहे, मला भेटायचं आहे अस म्हणून कुठल नाटक आहे हे माहित नाही. मात्र एमआयएम सोबत शिवसेनेची युती कधीच होऊ शकत नाही. कारण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी उभी केली आहे आणि या देशामध्ये हिंदूंना ताठ मानेने जगता याव यासाठी शिवसेना उभारली आहे. त्यामुळे एमआयएम आणि शिवसेना कदापि शक्य नसल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- शिवडी नावाशिवा फ्रांस हर्बल लिंकचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. २२ किलोमीटरचा हा सिलिंक देशातील सगळ्यात मोठ्या लांबीचा सिलिंग असणार आहे. शिवडी ते रायगड पर्यंत हा सीलिंक असणार आहे. या सीलिंकला वरळीचा कोस्टल हायवे जोडण्यात येणार आहे. तसेच रायगड हून चिरले जंक्शन हून हा हायवे मुंबई - पुणे हायवेला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई मार्गे रायगडला पोहचता येईल आणि रायगडहून चिरले जंक्शनवरून मुंबई - पुणे एक्स्प्रेस हायवेला जाता येणार आहे.त्यामुळे भविष्यात मुंबई - पुणे अप - डाऊन करणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार असल्याचे नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- सध्या काश्मिर फाईल्स या चित्रपटावरून देखील मोठ्या प्रमाणात राजकारण होत असल्याचा आरोप केला जाता आहे. या कश्मीर पंडितांवर जे अत्याचार झाले. आता जे लोक काश्मिरी पंडितांबाबत बोलत आहेत त्यावेळी तिथे कोणी दिसत नव्हत. त्यावेळी केवळ हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कश्मिरी पंडित यांच्या पाठीशी उभे राहिले, त्यांना संरक्षण आणि न्याय देण्याचं काम केल. त्यांना शाळेत ऍडमिशन देण्याच काम, त्यांना वाचवण्याचं काम बाळासाहेबांनीच केलं आहे. त्यावेळी पाकिस्तानच्या विरोधात बोलायचं धाडस किंवा हिंमत कोणीही करत नव्हत त्यावेळी फक्त एकच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पाकिस्तानच्या विरोधात बोलून त्यांना सडेतोड उत्तर दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 370 कलम रद्द केल्याबद्दल सर्वांनी त्या निर्णयाच स्वागत केल आहे. मात्र निर्वासित कश्मिरी पंडित त्यांचं पुनर्वसन योग्य पद्धतीने व्हावं आणि न्याय मिळावा अशी अपेक्षा सगळ्याचे असल्याचे नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- गडकिल्ले आपला इतिहास आणि परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जे गड किल्ले उभे केले तो इतिहास लोकांच्या स्मरणार्थ राहिला पाहिजे एक प्रेरणा मिळाली पाहिजे म्हणून राज्यसरकार गड किल्ल्यांचे संवर्धन किंवा जतन राहावे म्हणून जे काय उपाय योजना करायच्या आहते ते राज्य सरकार करत असल्याचे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/MPpEq9a

No comments:

Post a Comment