Breaking

Monday, March 21, 2022

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच धोनीला मोठा धक्का, तब्बल १४ कोटींना घेतलेला खेळाडू आयपीएलला मुकणार https://ift.tt/lFKSyJm

नवी दिल्ली : आयपीएल सुरु होण्यापूर्वीच महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सला एक मोठा धक्का बसला आहे. कारण लिलावात तब्बल १४ कोटी रुपये मोजून संघात घेतलेला एक खेळाडू आता आयपीएलच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नसल्याचे आता समोर आले आहे. चेन्नईचा कोणता खेळाडू आयपीएलच्या सामन्यांना मुकणार, पाहा...आयपीएल सुरु होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने जोरदार सराव सुरु केला आहे. पण आता चेन्नईला आयपीएल सुरु होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. कारण ज्याच्यावर चेन्नईच्या संघाची भिस्त होती असा दीपक चहर आता आयपीएलमधील काही सामन्यांना मुकणार असल्याचे समोर आले आहे. दीपक चहरला भारतीय संघातकडून खेळताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो सध्याच्या घडीला बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. पण अजूनही दीपक दुखापतीमधून सावरलेला नाही. चेन्नईचा या आयपीएलमधील पहिला सामना हा २६ मार्चला कोलकाता नाइट रायडर्सबरोबर होणार आहे. पण दीपक १४ एप्रिलपर्यंत तरी चेन्नईच्या संघातून खेळी शकणार नाही, अशी माहिती आता समोर आली आहे. चेन्नईच्या संघाचे हे मोठे नुकसान असेल. कारण दीपक हा पूर्वी फक्त वेगवान गोलंदाज म्हणून खेळत होता. पण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने फलंदाजीतही चमक दाखवली आहे. त्यामुळे दीपक हा आता एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी दीपक हा १५ एप्रिलनंतर चेन्नईच्या संघात दाखल होऊ शकतो, असे म्हटले जात होते. पण याबाबतची अधिकृत माहिती चेन्नईच्या संघाकडून किंवा बीसीसीआयने दिलेली नाही. त्यामुळे दीपक नेमका चेन्नईच्या संघात कधी दाखल होणार, याबाबत संदिग्धता आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघाची डोकेदुखी आता वाढलेली असेल. कारण दीपकच्या जागी आता कोणत्या अष्टपैलू खेळाडूला संधी द्यायची, या प्रश्नाचे उत्तर त्यांना शोधावे लागणार आहे. दीपकच्या जागी विदेशी खेळाडूला संधी दिली तर संघाचे समीकरण बदलू शकते आणि त्याचा त्यांना फटका बसू शकतो. त्यामुळे आता दीपकच्या जागी संघात कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता चेन्नईच्या चाहत्यांना नक्कीच असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Qngw2iV

No comments:

Post a Comment