म. टा. प्रतिनिधी, नागपूर आर्थिक वर्षाच्या अंतिम दिवशी काही तास बँकांचे सर्व्हर डाउन झाल्याने आर्थिक व्यवहार कोलमडले होते. त्यामुळे खातेधारक आणि करदात्यांची चिंता वाढली होती. सायंकाळी सहा वाजतादरम्यान सर्व्हर पूर्ववत झाल्याने बँकांचे आर्थिक व्यवहार सुरळीत झालेत. ( and have been facing difficulties as the have been down all day) क्लिक करा आणि वाचा- आर्थिक वर्ष २०२१-२२ संपले असून आजपासून नवीन आर्थिक वर्ष लागले आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस नेहमीच बँकांसाठी महत्त्वाचा असतो. तसेच प्राप्तीकराशी निगडीत आर्थिक प्रकरणे पूर्ण करण्याची अंतिम संधी या दिवशी असते. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच बँकांमध्ये गर्दी होती. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांमध्ये सर्व्हर डाउनची समस्या उद्भवली. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत ही समस्या कायम होती. कर भरण्यासाठी आलेल्यांना कागदपत्रे जमा करून देण्यास सांगत सर्व्हर सुरू होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार, अनेकांनी कागदपत्रे विश्वासाने सोपवून घरचा मार्ग धरला. तर काहींनी मात्र विलंबाने कर भरणा करावा लागण्याची खंत व्यक्त केली. यापैकी काहींनी ‘मटा’शी संपर्क साधत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रामदासपेठ आणि किंग्जवे येथील शाखेमध्ये सर्व्हर डाउनचा प्रश्न सायंकाळपर्यंत असल्याची माहिती दिली. क्लिक करा आणि वाचा- सलग तीन दिवस सुटी नुकताच २८ आणि २९ असा दोनदिवसीय संप झाला. त्यामुळे बँका बंद होत्या. या दोन्ही दिवसांत बँकांचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. त्यानंतर आज १ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेसह सर्व बँकांना सुटी आहे. तसेच शनिवारी गुढीपाडवा आणि ३ एप्रिलला रविवारची सुटी आहे. असे सलग तीन दिवस सुटी आल्याने बँकेशी संबंधित ज्यांचे काम गुरुवारी झालेले नाही, त्यांना सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wkfzXJV
No comments:
Post a Comment