Breaking

Thursday, March 31, 2022

IPL 2022 : मुंबईची ताकद वाढली; मॅच विनर खेळाडू पलटनमध्ये परतला https://ift.tt/T4M5u6Z

मुंबई : बोटाच्या दुखापतीतून सावरल्यानंतर भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने गुरुवारी (३१ मार्च) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघात प्रवेश केला. सूर्यकुमारने त्याचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला आहे आणि तो आता संघात सामील झाला आहे, अशी माहिती पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने दिली. वाचा- गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेदरम्यान बोटाला दुखापत झाल्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत होता. त्यामुळे २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या मुंबईच्या पहिल्या आयपीएल सामन्याला तो मुकला होता. वाचा- मॅच विनर खेळाडू परतल्याने संघाला दिलासा मुंबई इंडियन्सचा महत्वाचा फलंदाज संघात परतल्याने दिलासादायक वातावरण तयार झाले आहे. सराव सत्रात सूर्यकुमारने जसप्रित बुमराह, कायरन पोलार्ड, ईशान किशन यांच्यासोबत सराव केला. बोटाच्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर तो पहिल्यांदाच सराव सत्रात सामील झाला होता. वाचा- वाचा- रोहितनेही सुटकेचा नि:श्वास टाकला फ्रँचायजीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, 'सूर्यकुमार यादव त्याच्या अनिवार्य क्वॉरंटाईनमधून बाहेर आला आहे. त्याच्या उपस्थितीने संघात उत्साहाचे वातावरण आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात १७८ धावांचा बचाव करण्यात संघाला अपयश आले होते. अक्षर पटेल आणि ललित यादव यांनी सातव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद ७५ धावांच्या भागीदारीच्या जोरावर दिल्लीने १८.२ षटकांत सामना जिंकला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IC4gGRp

No comments:

Post a Comment