रत्नागिरी: महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्र्यांविरोधात आघाडी उघडणारे भाजप नेते हे २६ मार्च रोजी शनिवारी दापोली दौऱ्यावर येत आहेत. अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरूड येथील रिसॉर्ट बेकायदा असल्याचा आरोप करत हे अवैध रिसॉर्ट तोडण्यात येईल, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे व शिवसेनेचे प्रभारी तालुकाप्रमुख ऋषी गुजर यांनी सोमय्या याना दापोलीतच रोखून धरणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. (former mla has warned to stop in dapoli) किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, व भाजप आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. किरीट सोमय्या यांनी मिलींद नार्वेकर यांचा बंगला तुटला असून आता अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडू, असा इशारा देत सोमय्या यांनी चलो दापोली असा नारा ट्विट करून दिला होता. क्लिक करा आणि वाचा- किरीट सोमय्या यांच्यामुळे कोकणातील दापोली मुरूड येथील पर्यटन उद्योजकांना नोटिसा आल्या आहेत. जर कोकणातील पर्यटन उद्योगाच्या आड कोण येणार असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा संजय कदम यांनी दिला आहे. दापोली शहरातच सोमय्या यांना 'वापस चले जाव', असे म्हणत त्यांना रोखण्याचा इशारा दिला. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी आघाडीकडून हा इशारा सोमय्या यांना देण्यात आल्याने शनिवारी होणाऱ्या दापोली दौऱ्याकडे शिवसेना राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आमने सामने येण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. क्लिक करा आणि वाचा- पुण्यात सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांकडून हल्ला झाला होता. त्यानंतर दापोली दौऱ्यावर येत असताना शिवसेना राष्ट्रवादी आघाडीकडून हा इशारा देण्यात आल्याने या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. या बरोबरच मनसेनेचाही सोमय्यांना विरोध असल्याचे दिसते. रंगपंचमीच्या दिवशी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी व्हाईट झब्ब्यावर पुढील बाजूस 'व्हेरी गुड' व मागील बाजूस 'सोमय्या आला का?' असा प्रश्न लिहिल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळेच मनसेकडूनही सोमय्यांना दिलेला हा एक इशाराच असल्याचे मानले जात आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vj9btOd
No comments:
Post a Comment