Breaking

Thursday, March 24, 2022

मुंबई हादरली! १३ वर्षीय मुलीवर शेजारी तरूणाने केला बलात्कार, धक्कादायक माहिती आली समोर https://ift.tt/eAYM9wg

: महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढलेल्या असतानाच, मुंबईला हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका १३ वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या तरूणाने केला. अँटॉप हिल पोलिसांनी गुरुवारी संशयित आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केल्याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाला मुंबईतील अँटॉप हिल पोलिसांनी गुरुवारी अटक केली. मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिने आपल्या पालकांना ही बाब सांगितली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. ती मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलीने पोटात दुखत असल्याचे सांगितल्यानंतर पालकांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशीही माहिती पोलिसांनी दिली. आरोपी तरूण हा पीडितेच्या घराशेजारी राहतो. तो पत्नी आणि दोन मुलांना घेऊन पसार झाला. संशयित आरोपीची माहिती मिळाल्यानंतर, त्याला अटक केली. त्याला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी आरोपीविरोधात बलात्कार आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/6z1eqjt

No comments:

Post a Comment