मुंबई: दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड येथील एका ४० मजली इमारतीच्या लिफ्टच्या मेंटेनन्सचे काम सुरू असताना ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकजण ठार झाला आहे. तर एक जखमी आहे. (one person lost life and another was injured when an from 40 floors of a building in mumbai) ग्रँट रोड येथील बाळाराम स्ट्रीटवरील सिद्धज्योती या इमारतीत ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अनुभव त्रिपाठी (२६) आणि सूर्यकांत राजीव पुजारी (४३) हे दोघे जखमी झाले. मात्र, राजीव पुजारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही माहिती गोकुळदास तेजपाल रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सोहेल खान यांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- ही दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांना जवळच्या गोपाळदास तेजपाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दोघांपैकी एकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या दुर्घटनेतील जखमी अनुभव त्रिपाठी यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्रिपाठी यांच्या डोक्याला मार लागल्याची माहिती मिळत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. क्लिक करा आणि वाचा- तीन महिन्यांपूर्वी १३ डिसेंबर रोजी अंधेरी पूर्व येथील एका बहुमजली इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळून या अपघातात पाच रहिवासी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी ३१ डिसेंबर रोजी भायखळ्यात एका इमारतीची लिफ्ट कोसळून ३ लहान मुलांसह ५ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना जेजे मार्ग येथे एक ग्राऊंड प्लस १८ मजल्याच्या सीआरए इमारतीत घडली होती. तर २४ जुलै रोजी वरळीच्या हनुमान गल्लीमध्ये एका इमारतीची लिफ्ट कोसळून ४ जण ठार झाले होते. तर, या दुर्घटनेत एकजण गंभीर जखमी झाला होता. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/I5NlwXv
No comments:
Post a Comment