रत्नागिरी: रत्नागिरीतील येथील समुद्रकिनारा प्रसिद्ध असून येथे मौजमजा करण्यासाठी राज्याच्या विविध भागांतील पर्यटकांची नेहमीत गर्दी असते. राज्यातून करोना उतरणीला लागल्यानंतर येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. बोटचालकांच्या सतर्कतेमुळे या समुद्र किनाऱ्यावर रविवारी मोठी दुर्घटना टळली आहे. रविवारी फिरायला आलेल्या चार जण समुद्रात बुडता बुडता वाचले आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील मोरया वॉटर स्पोर्टच्या जेसकी बोटचालकांच्या सतर्कतेमुळे या चौघांना बचावले आहेत. ही घटना रविवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान घडली. (while four were drowning in the sea at in the boatmen saved their lives) गणेश सुतार (३५), शमाली सूर्यवंशी (३८), मृदुला सूर्यवंशी व मंदी सूर्यवंशी (१४) अशी वाचवण्यात आलेल्या चार जणांची नावे आहेत. हे सर्वजण सातारा जिल्हयातील नांदवडे तालुका कोरेगाव येथील रहिवासी आहेत. क्लिक करा आणि वाचा- कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात चार जण बुडत होते. हे चौघेजण अतीउत्साहात समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याचवेळी ते गटांगळ्या खाऊ लागले. हात उंचावून वाचवण्यासाठी मदत मागत होते. याचवेळी समुद्राकिनाऱ्यावर असलेल्या जेसकी बोट चालकांच्या हा सगळा प्रकार लक्षात आला. त्यांनी यावेळी क्षणाचाही विलंब न लावता जेसकी बोट चालकांनी आपली बोट खोल समुद्रात नेऊन आपली धाडसी कामगिरी करत त्या चार जणांना अक्षरशःमरणाच्या दाढेतून बाहेर काढले. अन्यथा मोठी दुर्देवी घटना घडली असती. क्लिक करा आणि वाचा- यापूर्वीही रत्नागिरी जिल्हयात समुद्र किनाऱ्यावर असे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी समुद्र स्नानाचा आनंद घेत असतात अतीउत्साहात केलेली चूक जीवावर बेतू शकते. त्यामुळे या सगळ्या घडणाऱ्या घटनांचा विचार करताना समुद्रात पर्यटन सफारीचा आनंद घेत असताना स्थानिकांनी केलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kUvmAnX
No comments:
Post a Comment