Breaking

Friday, April 1, 2022

Breaking: श्रीलंकेत अखेर आणीबाणी; जमावाने राष्ट्राध्यक्षांच्या घरावर चाल करताच... https://ift.tt/w4L0PUx

कोलंबो: अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडलेल्या निर्माण झाली असून शुक्रवारी हजारो निदर्शकांनी थेट राष्ट्राध्यक्ष यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर देशात थेट घोषित करण्यात आली आहे. देशभरात तत्काळ प्रभावाने आणीबाणी लागू करण्यात येत असल्याचे राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. ( ) वाचा : श्रीलंका स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाला सामोरा जात आहे. देशातील स्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात चालली आहे. देशाच्या अनेक भागांत जनक्षोभ उसळू लागला आहे. त्यात शुक्रवारी निदर्शकांनी आक्रमक होत थेट राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांच्या घरावर धडक दिली. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. निदर्शकांवर अमानुषपणे लाठ्या चालवण्यात आल्या. या घटनेनंतर असंतोष आणखीच वाढताना दिसत असून पुढील धोका लक्षात घेत राष्ट्राध्यक्षांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 'आवश्यक आणि अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू राहाव्यात तसेच सुरक्षेच्या कारणास्तव देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय मी घेत आहे', असे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. १ एप्रिल २०२२ या तारखेने हा आदेश जारी करण्यात आला असून संपूर्ण देशात हा आदेश लागू असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. वाचा : भडकला आंदोलनाचा वणवा देशाच्या विविध भागांत आंदोलनाचा वणवा भडकला आहे. पोलीस आणि संतप्त जमावामध्ये चकमकी झडत आहेत. संपूर्ण देशात तणावाचे वातावरण पसरले आहे. नागरिकांना गेल्या काही काळापासून अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. वीजसंकटामुळे अनेक भाग अंधारात बुडाले आहेत. बस आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठीही डिझेल उपलब्ध नाही. सार्वजनिक वाहतूक कोलमडली आहे. आर्थिक संकटामुळे कागदाचाही तुटवडा निर्माण झाला असून शाळा व कॉलेजच्या परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासह लोकांची सर्वच बाजूंनी कोंडी झाली असून त्यातूनच असंतोषाचा उद्रेक झाला आहे. राजधानी कोलंबो, नुगेगोडा या भागांत लागू करण्यात आली आहे. पश्चिम प्रांतातही मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक यांनी सांगितले. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/H5VQaNE

No comments:

Post a Comment