अमरावती: कोरोना निर्बंध शिथिल होतात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आठवडाभरापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते यांनी जिल्ह्यात सभा घेऊन आपल्या आमदाराची हकालपट्टी केली. अशातच आता १० एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे नेते, खासदार ()अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील राजकारण आतापासूनच तापू लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ( leader sharad pawars visit to will accelerate political developments) क्लिक करा आणि वाचा- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नवी बळकटी देण्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची स्थिती जाणून घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संवाद बैठक येत्या १० एप्रिल २०२२ रोजी दुपारी ३ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जेष्ठ नेत्यांचे देखील मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी विभागातील पाचही जिल्ह्यातील मंत्रीगण, आमदार, माजी आमदार, पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा निरीक्षक सर्व जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या सर्व फ्रंटचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद करून पक्ष बाळकटीला घेऊन शरद पवार साहेब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. क्लिक करा आणि वाचा- काही नेत्यांच्या पक्षप्रवेशाकडेही लक्ष अमरावतीत होऊ घातलेल्या संवाद बैठकीच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता, विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांनी विभागातील पाचही जिल्ह्याचा दौरा आरंभिला आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत काही नेते प्रवेश करणार असल्याची चर्चा सुद्धा जिल्ह्यात आहे. हे नेते कोण, हे येत्या काळात लवकरच स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या या दौऱ्यानिमित्त कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यानिमित्ताने यानिमित्ताने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शक्तीप्रदर्शन करण्याची संधी सुद्धा साधण्याची शक्यता स्थानिक विश्लेषकांनी वर्तविली आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/H0o5SAr
No comments:
Post a Comment