मुंबई : आंद्रे रसेलने ३१ चेंडूंत नाबाद ७० धावांची धमाकेदार खेळी साकारली आणि कोलकाता नाइट रायडर्सला मोठा विजय मिळवून दिला. पण या विजयानंतर केकेआरच्या संघासाठी अजून एक आनंदाची बातमी आली आहे. अजूनपर्यंत ही गोष्ट आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये कोणालाही करता आली नव्हती. केकेआरला कोणती आनंदाची बातमी मिळाली, पाहा...उमेश यादवचे चार विकेट्स आणि रसेलच्या नाबाद ७१ धावांच्या खेळीच्या जोरावर केकेआरने पंजाबवर सहा विकेट्स आणि ३३ चेंडू राखून मोठा विजय साकारला. या दणदणीत विजयानंतर केकेआरच्या संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे. कारण आतापर्यंत यार्षीच्या आयपीएलमध्ये एकाही संघाला दोन विजय मिळवत अव्वल स्थान पटकावता आले नव्हते, पण केकेआरने हे या सामन्यानंतर हे करून दाखवले आहे. केकेआरने आपल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला होता. पण दुसऱ्या सामन्यात त्यांना आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला. पण या सामन्यात केकेआरने पंजाबवर मोठा विजय साकारला आणि गुणतालिकेत ४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. उमेशने तिथट मारा करत पंजाबच्या चार फलंदजाांना बाद केले आणि त्यांचे कंबरडे मोडले. उमेशने यावेळी ४ षटकांत २३ धावा देत ४ बळी मिळवले आणि त्यामुळेच केकेआरला पंजाबच्या धावसंख्येला वेसण घालता आली. त्यामुळे पंजाबला यावेळी केकेआरपुढे विजयासाठी १३८ धावांचे आव्हान ठेवता आले. पण त्यानंतर धावांचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणेच्या रुपात केकेआरला पहिला धक्का बसला. केकेआरचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने अजिंक्यला यावेळी बाद केले. अजिंक्यला यावेळी १२ धावांवर समाधान मानावे लागले. पण अजिंक्यने यावेळी आयपीएलमधील ४००० धावा पूर्ण केल्या. त्यानंतर वेकटेंश अय्यरली लवकर बाद झाला, वेंकटेश अय्यरला यावेळी फक्त तीन धावा करता आल्या. कर्णधार श्रेयस अय्यरच्या रुपात यावेळी केकेआरला मोठा धक्का बसला. श्रेयसने यावेळी १५ चेंडूंत पाच चौकारांच्या जोरावर २४ धावा केल्या. त्यानंतर राणा यावेळी दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला आणि त्याला भोपळाही फोडता आला नाही. केकेआरची ४ बाद ५१ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर रसेलने अर्धशतक झळकावत केकेआरला सहा विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/FbNxlz1
No comments:
Post a Comment