Breaking

Friday, April 1, 2022

हे वागणं बर नव्हे, गुरुजी! 'फुल टू' शिक्षकाचा तुफान राडा; पोलिसांनाही केली धक्काबुक्की https://ift.tt/2rq1Kav

औरंगाबाद: शाळेचे म्हटलं की समाज त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतो, मात्र हाच शिक्षक जेव्हा दारूच्या नशेत भान विसरून एखाद्या असभ्य वर्तनाने सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असेल तर ते कुणालाही पटणार नाही. असेच काहीसे औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत पाहायला मिळाले. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या एका गुरुजींनी प्रचंड पिऊन रस्त्यावर प्रचंड गोंधळ घातला. एवढच नाही तर महिला पोलिसांना शिवीगाळ सुद्धा केली. (in a behaved rudely under the influence of alcohol) क्लिक करा आणि वाचा- याबाबत अधिक माहिती अशी की, तारु पिंपळवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले अशोक जिजाऊ पाटील यांनी शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास दारू पिऊन दारूच्या दुकानात गोंधळ घातला. त्यानंतर पोलीस ठाण्यात आल्यावर पुन्हा गोंधळ घालायला सुरवात केली. यावेळी समज देणाऱ्या पोलिसांना सुध्दा शिवीगाळ करायला सुरुवात केली. दरम्यान पोलीस ठाण्यात उपस्थितीत असलेल्या महिला पोलिसांना सुद्धा या गुरुजींनी शिवीगाळ करत गुन्हा का दाखल करत नाही म्हणून गोंधळ घातला. क्लिक करा आणि वाचा- समज देऊन सुद्धा गुरुजी आयकत नसल्याने पोलीस सुद्धा हतबल झाले होते. कर्मचारी समजून सांगत होते, अधिकारी समज देत होते मात्र गुरुजी काही आयकायच्या परिस्थितीत नव्हते. एवढच नाही तर जोरजोरात शिवीगाळ करून परिसरात गोंधळ घातला. अखेर दारूची नशा उतरल्यावर गुरुजी भानावर आले. त्यानंतर पोलीसांनी गुरुजीवर गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे हा गोंधळ सुरू असताना नेमकं काय झालं म्हणून अनेक लोकं ठाण्याचा परिसरात जमा झाले होते. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/t8IPZqB

No comments:

Post a Comment