Breaking

Friday, April 1, 2022

अजिंक्य रहाणेने केकेआरच्या विजयाबरोबरच रचला मोठा विक्रम, चाहत्यांना दिली आनंदाची बातमी https://ift.tt/sugPKM9

मुंबई : केकेआरचा अनुभवी सलामीवीर अजिंक्य रहाणे तिसऱ्या सामन्यातच एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. केकेरआने आजच्या सामन्यात पंजाबवर मोठा विजय साकारला आणि त्यामध्येच अजिंक्यने हा विक्रम रचत चाहत्यांना खूष केले आहे. अजिंक्यने नेमका कोणता विक्रम रचला, पाहा...अजिंक्यने या आयपीएलची दमदार सुरुवात केली होती. केकेआरने त्याला पहिल्या सामन्यात संधीही दिली. अजिंक्यने या संधीचे सोने केल्याचे पाहायला मिळाले. कारण अजिंक्यने या सामन्यात ४४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण आता अजिंक्यसाठी दुसऱ्या सामन्यापूर्वी अजून एक आनंदाची बातमी आली आहे. कारण दुसऱ्या सामन्यात अजिंक्यला एक मोठी संधी मिळणार आहे. अजिंक्य हा आयपीएमलध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी करत आला आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या आरसीबीविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात जर अजिंक्यने १५ धावा केल्या असत्या तर हा विक्रम दुसऱ्याच सामन्यात झाला असता, पण या सामन्यात अजिंक्य ९ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर आज झालेल्या तिसऱ्या सामन्यात अजिंक्यने जेव्हा सहा धावा केल्या तेव्हा त्याच्या नावावर हा नवीन विक्रम झाल्याचे पाहायला मिळाले. अजिंक्यने आजच्या सामन्यात १२ धावा केल्या आणि आयपीएलमध्ये ४ हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला. आतापर्यंत फक्त सात भारतीय खेळाडूंना राच हजार धावांचा टप्पा आयपीएलमध्ये गाठता आलेला आहे. त्यामुळे अजिंक्य आणि त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अजिंक्यसाठी ही आयपीएल स्पर्धा ही सर्वात महत्वाची ठरणार आहे. कारण या स्पर्धेत जर अजिंक्यने चांगल्या धावा केल्या तर त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे पुन्हा एकदा उघडू शकतात. पण जर अजिंक्यकडून चांगली कामगिरी झाली नाही तर त्याला भारतीय संघात प्रवेश मिळवण्यासाठी झगडावे लागेल. अजिंक्य हा केकेआरकडून खेळत असताना त्याच्या फलंदाजीत चांगलाच बदल झालेला जाणवत आहे. त्याच्या फलंदाजीत जर हाच सकारात्मकपणा कायम राहीला तर तो नक्कीच ही आयपीएल गाजवू शकतो आणि भारतीय संघासाठी दावेदारी सिद्ध करू शकतो.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/y0WU7EQ

No comments:

Post a Comment