कोल्हापूर: कोल्हापुरात तीन खासदार झाले. आता सहा आमदार झाले पाहिजेत. कोल्हापूरच्या महापालिकेत आता महापौर शिवसेनेचा मदतीशिवाय होणार नाही. पडद्यामागचे राजकारण बंद करा, आमचे ठरले आहे, असे सांगत जर शिवसेनेला डावलून काही ठरवत असाल, तर खुर्च्या हलवू असा टोला शिवसेनेचे खासदार यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे ना न घेता लगावला आहे. पैशाची मस्ती दाखवू नका नाहीतर तुमच्याशिवाय काय करायचं याची गुरुकिल्ली आमच्याकडे आहे असंही संजय राऊत म्हणाले. कोल्हापुरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेना नेते संजय राऊत दौऱ्यावर आहेत. काल कोल्हापुरात त्यांची जाहीर सभा झाली. या सभेत विरोधकांवर टीकेची तोफ उठवली. शिवसेना ही सगळ्यांना पुरून उभी राहणार हा आम्हाला अंबाबाईने दिलेला प्रसाद आहे. कोल्हापुरात दोन खासदार आहेत आता तीन होतील. आता सहा आमदार करायचे आहेत, असे खासदार राऊत म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- कोल्हापूर महानगरपालिकेत शिवसेनाच महापौर ठरवणार, असे म्हणत पडद्यामागचे राजकारण बंद करा. आमचे ठरले हे बाजूला ठेवून आमच्याशिवाय ठरणार नाही हे दाखवून द्या. आम्हाला डावलून काम कराल तर खुर्च्या हलवू, पैशाची मस्ती दाखवू नका, असा इशाराच राऊत यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता दिला. क्लिक करा आणि वाचा- आघाडी बिघाडी नंतर बघू, आता लक्ष कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांमध्येच, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2c6Hi9l
No comments:
Post a Comment