पुणे : मनसे अध्यक्ष (MNS ) यांनी माध्यम प्रतिनिधींवर संताप व्यक्त केला आहे. आज राज ठाकरे पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील 'अक्षरधारा' या पुस्तकाच्या दुकानात आले होते. त्या ठिकाणी लागलेले प्रसारमाध्यमांचे कॅमेरे पाहून त्यांनी माध्यम प्रतिनिधींवर संताप व्यक्त केला. 'आम्हाला जगू द्याल की नाही?' असा सवाल करत त्यांनी पत्रकारांना झापलं. राज ठाकरे २ दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. जहाल हिंदुत्ववादाची भूमिका आणि भोंग्याविरोधातल्या आक्रमक पवित्र्याने राज ठाकरे गेले २ महिने भलतेच चर्चेत आले आहेत. राज ठाकरे घरातून बाहेर पडले, ते अमुक ठिकाणी पोहोचले, याच्याही बातम्या मीडिया दाखवते आहे. त्याच मीडिया कव्हरेजचा एवढा अतिरेक झाला, की राज ठाकरे यांना माध्यम प्रतिनिधींना झापावं लागलं. नेमकं काय घडलं? राज ठाकरे २ दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुढील आठवड्यात त्यांची पुण्यात जाहीर सभा होतीय. त्याच सभेच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आणि मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी राज ठाकरे पुण्यात आले आहेत. तत्पूर्वी, आज दिववसभरातील कार्यक्रम आटपून ते बाजीराव रस्त्यावरील 'अक्षरधारा' या पुस्तकाच्या दुकानात आले होते. त्या ठिकाणी लागलेले सर्व कॅमेरे पाहून त्यांनी माध्यम प्रतिनिधींना पाहून संताप व्यक्त केला. 'आम्हाला जगू द्याल की नाही?' असा सवाल करत त्यांनी माध्यम प्रतिनिधींना झापलं. गाडीतून खाली उतरताच समोर उभ्या असलेल्या कॅमेरामन आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींवर त्यांनी राग व्यक्त केला. 'बंद करा त्या लाईट... माणसाला काय जगू द्या की नाही...?" असा सवाल करत कॅमेरा बंद करण्याचा त्यांनी हाताने इशारा केला. राज ठाकरेंचा रुद्रावतार पाहून माध्यम प्रतिनिधींनी देखील झटपट लाईट बंद करत कॅमेरेही बंद केले. त्यानंतर राज ठाकरे मीडियाशी न बोलता, कुठलीही प्रतिक्रिया न देता तावातावाने निघून गेले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/oIcsanJ
No comments:
Post a Comment