Breaking

Tuesday, May 17, 2022

मुंबईला धुळ चारत हैदराबादचे आव्हान कायम, पण कसे असेल प्ले ऑफचे समीकरण जाणून घ्या... https://ift.tt/l1WtUmq

मुंबई : हैदराबादच्या संघाने मुंबई इंडियन्सवर तीन धावांनी विजय साकारला आणि त्यांनी आयपीएलमधील आव्हान जीवंत ठेवले आहे. कारण या विजयानंतर हैदराबादचे १२ गुण झाले आहेत. सध्याच्या घडीला गुणतालिकेत कोलकाता आणि पंजाब या दोन्ही संघांचे समान १२ गुण आहेत. त्याचबरोबर राजस्थान आणि लखनौ या दोन्ही संघाचे समान १६ गुण आहेत. तर दिल्ली आणि आरसीबी यांच्या खात्यात प्रत्येकी १४ गुण आहेत. त्यामुळे हैदराबादला जर प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना अखेरच्या सामन्यात मोठा विजय मिळवावा लागेल. त्याचबरोबर दिल्ली आणि आरसीबीचा संघ पराभूत झाल्यावर हैदराबादचा प्ले ऑफची जास्त संधी असून शकेल. त्याचबरोबर कोलकाता आणि पंजाबच्या पराभवाचेही साकडे त्यांना घालावे लागेल. त्यामुळे हैदराबादचा प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग म्हणावा तेवढा सोपा नक्कीच नाही. हैदराबादच्या १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी झंझावात सुरुवात करून दिली. रोहित या सामन्यात मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते. पण यावेळी त्याचे अर्धशतक फक्त दोन धावांनी हुकले. रोहितने यावेळी ३६ चेंडूंत २ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ४८ धावा केल्या. रोहित शर्माच्यापाठोपाठ इशान किशनही बाद झाला आणि मुंबईच्या संघाला दुसरा धक्का बसला. इशानला यावेळी ४३ धावा करता आल्या. त्यामुळे एकेकाळी बिनबाद ९५ अशी मजल मारणाऱ्या मुंबईची २ बाद १०१ अशी स्थिती झाली. तिलक वर्माही यावेळी आठ धावांवर बाद झाला आणि मुंबईचा संघ पराभूत होणार का, असे वाटायला लागले. हैदराबादच्या संघाने यावेळी प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी धडाकेबाज फलंदाजीचा नमुना पेश केला. अभिषेक वर्मा बाद झाल्यावर राहुल त्रिपाठी फलंदाजीला आला आणि त्यानंतर हैदराबादची धाववगती वाढायला लागली. प्रियम गर्ग आणि राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी रचली. प्रियम गर्गने यावेळी ४२ धावांची खेळी साकारत राहुलला चांगली साथ दिली. त्यानंतर राहुलने निकोलस पुरनच्या साथीने पुन्हा एकदा मुंबईच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. निकोलस आणि राहुल यांच्यामध्ये तिसऱ्या विकेटसाठी पुन्हा एकदा ७८ धावांची भागीदारी पाहायला मिळाली. पुरनने यावेळी २२ चेंडूंत ३८ धावांची खेळी साकारत धावगती चांगलीच वाढवली. हैदराबादसाठी यावेळी हुकमी एक्का ठरला तो राहुल. कारण राहुलने यावेळी ४४ चेंडूत ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७६ धावांची खेळी साकारली आणि हैदराबादला मोठ्या धावसंख्येकडे तो घेऊन गेला. त्यामुळेच हैदराबादच्या संघाला मुंबईपुढे १९४ धावांचे आव्हान ठेवता आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/GcImYoC

No comments:

Post a Comment