Breaking

Wednesday, June 1, 2022

भारतीय संघ आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार, वेळापत्रक झाले जाहीर https://ift.tt/nwIuYKb

मुंबई : भारतीय संघ आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समोर आले आहे. या दौऱ्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजबरोबर तीन वनडे आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामने कधी होणार जाणून घ्या...भारताचा वेस्ट इंडिजमधील दौरा २२ जुलैला सुरु होणार आहे, हा दौरा ७ ऑगस्टपर्यंत असणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये २२ जुलैला पहिला वनडे सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा वनडे सामना हा २४ जुलै आणि तिसरा वनडे सामना हा २७ जुलैला होणार आहे. अन्य दोन्ही वनडे सामने हे पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हलवर होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिन्ही वनडे सामने हे संध्याकाळी ७.०० वाजता सुरु होणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका ही २९ जुलैपासून सुरु होणार आहे. हा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथील ब्रायन लारा स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा ट्वेन्टी-२० हा १ ऑगस्टला सेंट किंट्स येथे होणार आहे. या मालिकेतील तिसरा सामना २ ऑगस्टला याच मैदानात खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा सामना ६ ऑगस्टला फ्लोरिडा येथे खेळवण्यात येईल. हा सामना बोवर्ड कौंटी ग्राउंडवर होणार आहे. या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना हा ७ ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील सर्व सामने हे रात्री ८.०० वाजता सुरु होणार आहेत. भारतीय संघ सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तयारी करत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर भारतीय संघ आयर्लंडमध्ये दोन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे, त्यानंतर भारतीय इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/AmNsRzO

No comments:

Post a Comment