म.टा. प्रतिनिधी, (Desi Liquor) पूर्वी एकाच प्रकारात उपलब्ध व्हायची. मात्र, आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसूलवाढीसाठी खासच शक्कल लढविली आहे. चार प्रकारांत देशी दारू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबतची अधिसूचनाही काढण्यात आली आहे. याअंतर्गत लवकरच रंगीत आणि रंगहीन अशी दारू बाजारात उपलब्ध होणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. (now the will be available in four variants) राज्य शासनाने महाराष्ट्र देशी नियम १९७३मध्ये सुधारणा केली आहे. या सुधारित नियमांनुसार, ‘महाराष्ट्र देशी मद्य तिसरी सुधारणा नियम २०२२’ असे संबोधण्यात येणार आहे. मद्यार्काच्या प्रकारानुसार महसूलही वसूल करण्यात येणार आहे. पहिल्या प्रकारात एका प्रुफ लिटरला १० रुपये (उत्पादन शुल्क) आकारला जाईल, दुसऱ्या प्रकारात १५५ रुपये, तिसऱ्या प्रकारात १८० रुपये आणि चौथ्या प्रकारात २५० रुपये महसूल आकारला जाईल. यापूर्वी एका प्रुफ लिटरला सरसकट १५५ रुपये महसूल आकारला जात होता. क्लिक करा आणि वाचा- अशी मिळणार... -काजूबोंडे आणि मोहफुलांपासून प्राप्त मद्यार्क वापरून रंगीत पदार्थ न वापरता तयार केलेले मद्य हा एक प्रकार आहे. यात अल्कोहोलचे प्रमाण ४२.८ टक्के आहे. -काजूबोंडे आणि मोहफुलांव्यतिरिक्त इतर पदार्थांपासून प्राप्त मद्यार्क वापरून रंगीत पदार्थ न वापरता तयार केलेले मद्य हा दुसरा प्रकार आहे. यात ३५.६६ टक्के अल्कोहोल असेल. -काजूबोंडे आणि मोहफुलांव्यतिरिक्त इतर पदार्थांपासून प्राप्त मद्यार्क वापरून रंगीत पदार्थ न वापरता तयार केलेले मद्य हा तिसरा प्रकार. यात ४२.८ टक्के अल्कोहोल आहे. -चौथ्या प्रकारात धान्यधारित मद्यार्कामध्ये रंगीत पदार्थांचा वापर करण्यात येईल. या मद्यात ४२.८ टक्के अल्कोहोल असेल. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hjl9wNF
No comments:
Post a Comment