पुणे( भोर): भोर तालुक्यातील रायरेश्वर गडाच्या पायथ्याशी असलेल्या झांबुळवाडी ( कार्ले) येथून चालत ट्रेकिंगला जात असताना एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा विद्यार्थी बारामती येथील शारदा नगर येथील विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालययातील १२ वी ऍग्रोचा विद्यार्थी आहे. शुभम चोपडे (वय १७) असे मृत झालेल्या मुलाचे नाव असून शुभम हा मूळचा करमाळा तालुक्यातील उंब्रट गावचा विद्यार्थी आहे. त्याच्या मृत्यूनंतर गावभरात शोककळा पसरली आहे. वाचा- याबाबत अधिक माहिती अशी की, आज ( शुक्रवारी) सकाळी बारामतीहून किल्ले रायरेश्वर येथे विद्यालयातील ४६ विद्यार्थी व शिक्षक ट्रेकिंगसाठी गेले असताना सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास शुभम चोपडे हा मित्रासमवेत ट्रेक करत होता. ट्रेक करत असताना त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याला अंबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वाचा- ... त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. त्यामुळे ट्रेकिंगला जाताना पूर्ण माहिती असल्याशिवाय आणि आपली तपासणी केल्याशिवाय आणि प्रशिक्षणाशिवाय जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. शुभम हा करमाळा तालुक्यातील उंब्रट गावचा मूळ रहिवाशी असून बारामतीत तो शिक्षणासाठी आला होता. त्याच्या या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3KOBbIl
No comments:
Post a Comment