मुंबई : 'राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला थोडा विलंब झाला असला, तरी कोणत्याही स्तरावर वाद नाही. येत्या तीन दिवसांत मंत्रीमंडळाचा विस्तार करू,' असे स्पष्टीकरण यांनी गुरुवारी दिले. शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. 'शिंदे गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याच्या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या दाव्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले, 'ते स्वप्न पाहत असतात. त्यांना स्वप्न पाहू द्या. राज्यात १६६ आमदारांचे सरकार आहे. लोकसभेतही १२ आमदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. राज्यात आणि केंद्रातही पक्षाकडे बहुमत आहे. सरकार पूर्ण मजबूत आहे.' शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. डाके यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, 'लिलाधर डाकेसाहेब यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अगदी सुरुवातीचे जे नेते होते, त्यात डाकेसाहेबांनी काम केले असून, त्यांचे आनंद दिघे साहेबांशी निकटचे संबंध होते.' मंत्रीमंडळ विस्तारही तीन दिवसांत होईल, असे ते या वेळी म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/fth5ps7
No comments:
Post a Comment