नवी दिल्ली : क्रिकेटसाठी सध्याच्या घडीला सुगीचे दिवस आहेत. त्याचबरोबर करोनानंतर एकामागून एक स्पर्धा सुरु आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. पण एकाच दिवशी आता भारताचे दोन संघ मैदानात उतरणार असल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही संघ शुक्रवारी एकाच दिवशी मैदानात उतरतील. वाचा- सध्याच्या घडीला भारतीय पुरुष संघ हा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिला संपलेली आहे आणि आता ट्वेन्टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना हा शुक्रवारी होणार आहे. हा सामना रात्री ८.०० वाजता खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे हा भारताला पहिला संघ शुक्रवारी मैदानात उतरणार आहे. वाचा- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचीही दिमाखात सुरुवात झाली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतही क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत भारताचा महिला संघ सहभागी झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना हा शुक्रवारीच होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने जोरदार सराव केला आहे आणि स्पर्धेत विजयी सलामी देण्यासाठी ते उत्सुक आहेत. भारताचा हा दुसरा संघ शुक्रवारी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या दोन्ही सामन्यांमध्ये भारताची कशी कामगिरी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भारताचा पुरुष संघ - रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह. भारतीय महिलांचा संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, एस मेघना, तानिया सपना भाटिया (डब्ल्यूके), यास्तिका भाटिया (डब्ल्यूके), दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका ठाकूर. , जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा. राखीव खेळाडू: सिमरन बहादूर, रिचा घोष आणि पूनम यादव.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9seWLVI
No comments:
Post a Comment