बार्बाडोस : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताने वनडे मालिका ३-० अशी जिंकली आहे. आता शुक्रारपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका सुरु होणार आहे. या मालिका विजयासाठी आता रोहितसेना सज्ज झाली आहे. भारताच्या वनडे आणि ट्वेन्टी-२० संघात मोठा बदल असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. वनडे मालिकेत युवा खेळाडूंना संधी दिली होती, तर ट्वेन्टी-२० मालिकेत रोहित शर्मासह अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता भारतीय संघ ट्वेन्टी-२० मालिका जिंकणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. वाचा- ट्वेन्टी-२० सामने किती वाजता आणि कुठे पाहता येतील, जाणून घ्या...भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका संपल्यावर आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते ट्वेन्टी-२० मालिकेचे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.या मालिकेतील पहिला सामना २९ जुलैला खेळवण्यात येणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या सामन्याचा टॉस हा संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने सामना सुरु होणार आहे. त्यामुळे हा सामना रात्री ८.०० वाजता सुरु होणार आहे. वनडे सामन्यांपेक्षा हे ट्वेन्टी-२० सामना एक तास उशिराने सुरु होणार आहेत. हे ट्वेन्टी-२० सामने रात्री ८.०० ते १२.०० या कालावधीत होतील, असे म्हटले जात आहे. पण जर पावसाने खोडा घातला तर हे सामने उशिरा संपू शकतात. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या वनडेमध्ये पावसाने खोडा घातला होता. त्यामुळे हा सामना उशिरा संपला होता. पावसामुळे या सामन्यात डकवर्थ लुईस नियम वापरण्यात आला होता. भारताने या सामन्यासह मालिकाही जिंकली आहे. त्यामुळे आता ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेवर सर्वांचे लक्ष लागलेले असेल. वाचा- भारताचा संभाव्य संघ - रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/r2TIVoJ
No comments:
Post a Comment