नवी दिल्ली : सोशल मीडियावर काय होऊ शकते, हे कोणालाही सांगता येणार नाही. सध्याच्या घडीला भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची पोलखोल या सोशल मीडियावर झालेली आहे. एका चाहत्याने ट्विटरवर फोटो पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. वाचा- वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी विराट कोहलीची निवड भारतीय संघात करण्यात आली होती. पण कोहलीने हट्ट करत आपण सुट्टी घेत असल्याची भूमिका घेतली. त्यामुळेच त्याला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी त्याला संघाबाहेर करण्यात आले. पण वेस्ट इंडिजमध्ये न जाता आपण नेमकं कुठे फिरायला जाणार आहोत, हे कोहलीने सांगितले नव्हते. पण या एका फोटोमुळे विराट कोहली नेमका कोणत्या देशात भटकंती करतोय, हे आता समोर आले आहे. वाचा- विराट कोहली सध्याच्या घडीला फॉर्मात नाही. त्यामुळे तो जेवढे सामने खेळेल, तेवढे त्याच्यासाठी चांगले आहे. निवड समिती कोहलीला या दौऱ्यासाठी संघात स्थान देत होती, पण कोहलीने हटवादी भूमिका कायम ठेवत आपण खेळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे कोहलीला वेस्ट इंडिजसाठी निवडण्यात आलेल्या संघात स्थान दिले नाही. पण या गोष्टीचा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर परीणाम होऊ शकतो. वाचा- कोहलीने आपल्या चाहत्याबरोबर एक फोटो काढला आणि या चाहत्याने तो फोटो ट्विटरवर पोस्ट केला. त्यामुळे कोहली हा पॅरीसमध्ये असल्याचे आता समोर आले आहे. कोहली यावेळी पत्नी अनुष्काबरोबर पॅरीसमध्ये भटकंती करत असल्याचे आता समोर आले आहे. कोहलीचा काही दिवस मुक्काम आता पॅरिसमध्ये असणार आहे. त्यानंतर तो भारतामध्ये रवाना होणार आहे. कारण कोहलीला भारतीय संघात या दौऱ्यानंतर पुनरागमन करायचे आहे. त्यामुळे कोहली काही दिवसांनी पुन्हा एकदा सराव करताना दिसू शकतो. विराटला कदाचित झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात स्थान देण्यात येऊ शकते. जर या दौऱ्यासाठी त्याची निवड करण्यात आली नाही तर त्याला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी संघात स्थान दिले जाऊ शकते. त्यामुळे आता निवड समिती विराट कोहलीला कोणत्या स्पर्धेसाठी संघात स्थान देते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HFDWCrs
No comments:
Post a Comment