: सध्या राजकारणातील महाविकास आघाडीचे बडे नेते इडीच्या कारवायांबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र पुरावे असल्याशिवाय ईडीची टाच येत नाही. ज्यांच्या विरोधात झाली त्यांच्यापैकी कोणीही हे सगळे निरर्थक असल्याचे सांगितले नाही. गेल्या काही महिन्यात कित्येक मोठमोठ्या नेत्यांवर जप्तीची कारवाई झाली आणि कित्येकांना जेलमध्ये जावे लागले. त्यामुळे अशा प्रकारच्या निरर्थक गोष्टी मोठ्या नेत्यांनी करू नये, असा टोला यांनी लगावला आहे. (BJP leader has said that does not take action unless there is evidence) भाजप आमदार आणि ठाणे शहराध्यश निरंजन डावखरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध उपक्रम राबवले होते. तसेच लोटस इंटरनॅशल फिल्म फेस्टीवलच्या माध्यमातून ३२ लघुपट दाखवले जाणार आहेत. हे लघुपट उत्तम दर्जाचे असून त्या फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ मान्यवर म्हणून उपस्थित होत्या. यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी राजकीय विषयांवर देखील सडकून टीका केली आहे. क्लिक करा आणि वाचा- महविकास आघाडी सरकार आल्यानंतर माजी मंत्री आणि युवा सेना प्रमुख हे राज्यात विविध ठिकाणी दौरे करत आहेत. या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे हे शिंदे सरकारवर सडकून टीका करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना चित्र वाघ यांनी देखील टोलेबाजी केली आहे. आदित्य ठाकरे यांना जे बोलायचय ते बोलू शकतात, त्यांचा अधिकार आहे. त्यांचे वडील स्वतः मुख्यमंत्री असताना स्वतः म्हणायचे आमच सरकार पाडून दाखवा. त्यावेळी फडणवीस यांनी सांगितलं होते की, आम्हाला तुमचे सरकार पाडायची गरज नाही, तुमचे सरकार कधी पडेल हे तुम्हाला कळणार देखील नाही आणि त्यांची वाणी सत्य झाली. क्लिक करा आणि वाचा- त्यामुळे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही असा टोला यावेळी चित्रा वाघ यांनी लगावला आहे. हे शिंदे-फडणवीस सरकार लोकांसाठी आणि लोकभिमुख सरकार आहे. मोठ्या संख्येने निवडून येऊन देखील भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले होते. भाजपने ती भूमिका देखील निभावली. आता सत्तेत आहेत ती सुद्धा भूमिका भाजप प्रखरपणे मांडणार असल्याचे मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केले आहे क्लिक करा आणि वाचा- ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झालेला आहे. दोन वर्ष महाविकस आघाडी सरकारने टांगतिला ठेवलं आणि आता श्रेय घ्यायला सगळेच येतात. मात्र, जो मागासवर्गीय आयोग गठीत करण्यात आला होता त्यांना देखील निधी पुरवला नव्हता. इम्पेरिकल डाटा मध्ये चालढकल करण्यात येत होती. ते रखडलेलं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने तात्काळ करून ओबीसी समाजाला आरक्षण आणून दिल्याचं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केल आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/JS0YC6n
No comments:
Post a Comment