Breaking

Thursday, July 21, 2022

आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी... पेटते दिवे हाती घेऊन शिवसैनिकांनी घेतली एकनिष्ठतेची शपथ https://ift.tt/m7LB0dG

जळगाव/धुळे : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्ष दोन गटात विभागला गेला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावरील निष्ठा दर्शवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवले जात आहे. जळगावातही शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचे समर्थन केले. हातात दिवे घेऊन शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, अशी एकनिष्ठतेची शपथ घेतली. जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे गुरुवारी संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. या मेळाव्यात संजय सावंत यांनी उपस्थित सर्व शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याची एकनिष्ठेची शपथ देण्यात आली. प्रत्येक शिवसैनिकाने हातात दिवे घेऊन आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची शपथ यावेळी घेतली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहिले आपण बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी एकनिष्ठ... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मूळ शिवसेनेतील बहुसंख्य आमदारांसह साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनी बंड करत नवी चूल मांडल्याने आता धुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिकांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पक्षप्रमुखांविषयी व मूळ शिवसेनेविषयी निष्ठा व्यक्त करणारी प्रतिज्ञा लिहून घेतली जात आहे. आमदारांच्या बंडखोरीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून शिवसैनिकांकडून आपण उद्धव ठाकरे गटातील मूळ शिवसैनिक असल्याबाबत १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणी करून घेण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार धुळे शहरातील शिवसेनेच्या मुख्य कार्यालयात पदाधिकारी व शिवसैनिकांकडून ही स्टॅम्प भरून घेतले जात आहे. धुळे जिल्ह्यातील शिवसेना कार्यालयामध्ये स्टॅम्प पेपर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून भरून घेतले जात असून जवळपास पाच हजार स्टॅम्प पेपर्स धुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांतर्फे भरून घेण्यात आले आहेत. अजून काही दिवस ही मोहीम अशाच पद्धतीने सुरू राहणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली नाव, वय, पत्ता, शिवसेनेतील पदाच्या उल्लेखासह मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञापत्र घोषित करीत आहे की, माझी शिवसेनेच्या घटनेवर पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श-तत्त्वांवर अढळ निष्ठा आहे. माझा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रती मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे. शिवसेनेच्या घटनेतील उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी मी कार्यरत राहील, असे मी प्रतिज्ञापत्र बाँडद्वारे लिहून देत आहे. शिवसैनिकांची निष्ठा व श्रद्धा अशा प्रकारे कागदातून व्यक्त होताना धुळे जिल्ह्यात आता दिसत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/UPsaSto

No comments:

Post a Comment