: जिल्ह्यात १० ते १२ दिवसांचे बाळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार उघडकीस येताच परिसरातील नागरिकांनी बाळाच्या नातेवाईकाचा शोध घेतला. दरम्यान, बाळाच्या नातेवाईकांचा पत्ता लागला नाही. या लहान बाळाला अकोला शहरातील शिशुगृहात ठेवण्यात आले आहे. ( was found in an open space in washim) वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दुधाळा येथील मोकळ्या जागेत काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास एक बाळ आढळून आले. या बाळाचे वय १० ते १२ असे दिवस एवढे असल्याचे सांगण्यात येत आहे. बाळाचे पालक किंवा नातेवाईक आढळून आले नाहीत. आता या बाळाला अकोल्याच्या बाल कल्याण समिती यांच्या आदेशान्वये मलकापूरच्या उत्कर्ष शिशुगृह संस्थेत दाखल करण्यात आले आहे. क्लिक करा आणि वाचा- वाशिम जिल्ह्यातील दुधाळा येथे आढळलेल्या या बालकाचे कुणी पालक अथवा नातेवाईक असल्यास त्यांनी अधिकृत पुरव्यासह आजपासून पुढील ६० दिवसांच्या आत उत्कर्ष शिशुगृह बसेरा कॉलनी अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन शिशुगृहाने केले आहे. पुराव्याची छाननी करून खात्री पटल्यानंतर हे बाळ नातेवाईक अथवा पालकांकडे दिले जाईल. क्लिक करा आणि वाचा- अकोल्यातील शिशुगृहाने केलेल्या आवाहनानुसार आज २३ जुलैपासून पुढील ६० दिवसांच्या आत संबंधितांनी संस्थेशी बालकाच्या नातोवाईकांनी संपर्क करावा. कोणीही संपर्क न केल्यास उत्कर्ष शिशुगृह हे बाल कल्याण समिती यांच्या आदेशानुसार बालकाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची कार्यवाही करेल, असे जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर कोणाचाही या बालकावर कुठल्याही प्रकारचा कायदेशीर हक्क राहणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे संस्थेने म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/XPqeK35
No comments:
Post a Comment