Breaking

Saturday, July 23, 2022

दोन मंत्र्यांचं सरकार कोसळणार, अजितदादा मुख्यमंत्री होणार- अमोल मिटकरी https://ift.tt/Aq0kjVQ

पुणे : विधानपरिषदेचे आमदार आज बारामती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले की, दोन मंत्र्यांचं असणारं हे सरकार लवकरच बरखास्त झालेलं दिसेल आणि मध्यावधी निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगली कामगिरी दिसेल. असा विश्वास त्यांनी यावेळी दर्शवला. ते पत्रकारांशी बोलत होते. भविष्यात हेच होणार असल्याचं मिटकरी यांनी यावेळी सांगितलं. सध्या राज्यात एका गटाकडून ऑफर सुरू आहे. या गटाचे अध्यक्ष व्हा मर्सडीज घ्या, दोन लाख रुपये महिना घ्या, दोन कोटी रोख घ्या, असं म्हणत मिटकरी यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणातील घोडेबाजारासंबंधी भाष्य करत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. माजी उपमुख्यमंत्री व तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार हे आमदारांना निधी देत नसल्याचा आरोप करत काही आमदार शिंदे गटात सामील झाले. भाजपच्या एका आमदाराने सांगावे की निधी दिला नाही. 'काय झाडी.. काय डोंगर.. काय हाटील..' असे म्हणणाऱ्या आमदार शहाजी पाटील यांना तर ३८० कोटीहून अधिक निधी दिला. तरी आरोप करण्यात आले की, आमदारांना निधी न देता अख्खा निधी बारामतीकडे पळवला. असा खुलासा करत मिटकरी यांनी निधी दिला नाही असा आरोप करणाऱ्यांवर निशाणा साधला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/yQEJHxr

No comments:

Post a Comment