Breaking

Sunday, July 31, 2022

वाढदिवस होता; मुलाने केकवरची स्पार्कल मेणबत्ती पेटवली आणि घडले ते खूपच भयानक https://ift.tt/Q2YFk5y

चंद्रपूर : वाढदिवसाच्या निमित्ताने केकवर लावलेली फवारे उडविणारी मेणबत्ती १० वर्षीय बालक हातात पकडून असताना स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या स्फोटात दहा वर्षीय बालकाचा गाल पूर्णतः फाटून छिन्नविछिन्न झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात घडली आहे. जखमी मुलाचे नाव आरंभ डोंगरे असून तो भीसी गावातील आहे.आरंभ हा आपल्या वडिलांच्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाला आला होता. सुरू असतानाच ही घटना घडली. (on a sparkler candle exploded splitting a boys cheek and tongue) या घटनेनंतर जखमी आरंभला तत्काळ ब्रह्मपुरी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मुलावर प्लास्टिक सर्जरी करून जवळपास १५० टाके घातले. ही शस्त्रक्रिया तब्बल पाच तास चालली असे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील भिसी येथील रहिवासी असलेले विनोद डोंगरे हे आपल्या पत्नी व १० वर्षीय मुलासह मित्राच्या घरी असलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते. तेव्हा सायंकाळी ६ वाजता वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू झाला . केकवर असलेली फवारे उडवणारी मेणबत्ती पेटविण्यात आली. मेणबत्तीवर फुंकर घालून १० वर्षीय मुलगा आरंभ याने ती मेणबत्ती आपल्या हातात पकडली असता तिचा स्फोट झाला. या स्फोटाची भीषणता एवढी होती की, त्यामध्ये आरंभ याचा उजवा गाल पूर्णतः फाटून छिन्नविछिन्न झाला. गालातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्याला ब्रह्मपुरी येथील आस्था रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर लगेचच शुक्रवारी त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करून त्याचा फाटलेला गालाचा भाग आणि जीभ जोडण्यात आली. आरंभ हा गंभीर अवस्थेत होता. त्याची जीभसुद्धा पूर्णतः फाटली होती. उजवा डोळा २ ते ३ सेमीने वाचला. दोन ते तीन दिवस त्याला बोलता व काहीही खाता येत नव्हते. अशा बिकट परिस्थितीत आम्ही नागपूरवरून प्लास्टिक सर्जन डॉ . श्रीकांत पेरका यांना उपचारासाठी पाचारण केले. उपचारादरम्यान १५० टाके मारावे लागले. ही शस्त्रक्रिया आस्था हॉस्पिटलचे डॉ. पंकज लडके डॉक्टर सुमित जयस्वाल यांनी यशस्वीरित्या पार पाडली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/mgh018F

No comments:

Post a Comment