Breaking

Saturday, July 23, 2022

आता शरद पवारांनी शिवचरित्र लिहून महाराजांवर झालेला अन्याय दूर करावा, ब्राह्मण महासंघ आक्रमक https://ift.tt/ZAK02ga

पुणे : बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं आणि त्यांच्या लिखाणाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर दुसरा कुणीही केला नाही, असं परखड मत ज्येष्ठ नेते यांनी व्यक्त केलं. इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केले. यावर ब्राह्मण महासंघाने आक्रमक भूमिका घेत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला तसेच त्यांनी पुरंदरेंवरील टीकेनंतर दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी पवारांकडे केली. "शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी ब्राह्मण संघटनांना भेटायला बोलावलं होतं. आम्ही त्यांची ती भेट नाकारली होती. शरद पवार यांना ब्राह्मण द्वेषाचेच राजकारण करायचंय आणि त्यांच्या विचारात काही फरक पडणार नाही हे कारण सांगून आम्ही ती भेट नाकारली होती आणि दुर्दैवाने आमची ती भीती खरी ठरली. आज शरद पवार यांनी बोलताना बाबासाहेब पुरंदरेनी छत्रपतींवर अन्याय केलं, असं वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत", असं ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष म्हणाले. "एखादा चरित्रकार एखादी कादंबरी लिहीत असताना त्यावर अन्याय कसा करू शकतो हे पवार साहेबांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. याच्याही पुढे जाऊन आमची आता ही मागणी आहे की शरद पवारांनी शिवचरित्र लिहावं, कादंबऱ्या लिहाव्यात आणि शिवछत्रपतींवर जो अन्याय झाला आहे तो अन्याय दूर करावा", असंही आनंद दवे म्हणाले. तर पवारांना जे शिवाजी महाराज अपेक्षित आहेत जे ब्राह्मणद्वेष्टे होते, जे इस्लामला मानणारे होते, असं पवारांना म्हणायचं आहे का? असा सवालही दवे यांनी विचारला. मात्र, आपण इतिहास तज्ज्ञ नसताना आपला इतिहास अभ्यास नसताना फक्त जातीचं राजकारण करण्यासाठी पवारांनी पुन्हा एकदा बाबासाहेब पुरंदरेंवर केलेली टीका निषेधार्ह आहे. यासाठी शरद पवारांनी महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे. * शरद पवार पुण्यात बोलताना नेमके काय म्हणाले होते? महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी शोधली. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता 'कुळवाडी भूषण' असा केला. मात्र यांनी खोटा इतिहास पसरवला. माझ्यामते शिवछत्रपतींवर इतका अन्याय कोणी केला नाही. शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला, असं पवार म्हणाले. शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास, दादोजी कोंडदेवांचे योगदान काय? अन्य घटकांचं महत्व वाढवण्याचे काम त्यांनी केलं. मात्र रामदासांचे योगदान काय, दादोजी कोंडदेवांचे योगदान काय? शिवाजी महाराजांना ज्यांनी दिशा दिल्या. त्या फक्त जिजाऊ होत्या. सत्य गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. त्यांच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही, असं पवार म्हणाले. पुरंदरेंनी जे काही लिखाण केलं, जी काही मांडणी केली, ती मांडणी ज्याला सत्यावर विश्वास आहे तो घटक कधीही मान्य करणार नाही. काही व्यक्तींचं महत्व वाढवण्यासाठी त्यांनी विशेष काळजी घेतल्याचं दिसून येतं, असंही पवार म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xhoYbIs

No comments:

Post a Comment