पुणे: महाराष्ट नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील पक्षाच्या नेत्यांची आज बैठक घेतली होती. या बैठकीत पुण्याचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे हे ही उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि मनसे बळकट करण्यासाठी काही नेत्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. पुण्याचे वसंत मोरे यांना ही बारामती लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आला आहे. मात्र, सध्या वसंत मोरे चर्चेत आहेत त्या पोस्ट मुळे जी त्यानी फेसबुकवर केली आहे. साहेबांनी सांगितलं तर बारामती काय दिल्लीत ही धडक देऊ , कारण मराठा जात कधी मागे पुढे बघत नाही आणि बारामती लोकसभा म्हणजे फक्त बारामती शहर नाही तर त्यात भोर, वेल्ला, मुळशी, पुरंदर, हावेली, दौंड , इंदापूर, आणि पुणे शहर ही आहे. मी तर म्हणलो मी येत आहे, अशी सूचक पोस्ट वसंत मोरे यांनी केली आहे. वसंत मोरे यांच्या रोष नेमका कोणावर आहे? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधी भूमिका घेतल्यामुळे वसंत मोरे नाराज झाले होते. कारण, वसंत मोरे हे मराठा कुटुंबातील जरी असेल तरी त्यांच्या मतदारसंघात 80 टक्के मतदार हा मुस्लीम वर्ग आहे. म्हणून वसंत मोरें यांनी आपली नाराजी जाहीरपणे सांगितली होती. मात्र, त्यांच्या नाराजीमुळं त्यांना पक्षातील पद गमवावं लागलं. वसंत मोरेंची नाराजी मीडियामध्ये चांगलीच चर्चेत आली होती. म्हणून त्यांचं मनसे पुणे शहर अध्यक्षपद काढून माजी नगरसेवक साईनाथ बाबर याना देण्यात आलं होतं. राज ठाकरेंचा तो आदेश त्यांच्या जिव्हारी लागला होता. वसंत मोरे हे पक्ष सोडून शिवसेनेत जातील का अशा चर्चांना उधाण आलं होतं. याबाबत पक्षातील दुफळीमुळे माझं पद काढण्यात आलं आहे असा थेट त्यांनी आरोप केला होता. पार्ट टाइम कार्यकर्त्यांमुळे पक्ष ढिसाळ होत चाललाय अशी तक्रार वारंवार त्यांनी राज ठाकरेंकडे केली होती. अनेक पक्षांच्या कार्यक्रमात वसंत मोरे हे गैरहजर असायचे. वसंत मोरे हे पक्ष सोडतील का अशा चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. मात्र, पक्ष न सोडल्यानं मोठी जजबादारी मिळताच वसंत मोरे यांनी फेसबूक पोस्ट करत थेट आव्हान दिलं आहे. वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट आज मुंबईत झालेल्या बैठकीत पुण्यातील पदाधिकाऱ्यांपैकी किशोर शिंदे , हेमंत संभूस, आणि गणेश सातपुते याना मावळ मतदारसंघाची जबादारी देण्यात आली आहे. तर, शिरूर मतदारसंघावर अजय शिंदे, बाळा शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वसंत मोरे यांना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक पदी नेमण्यात आलं आहे. मोरेंनी फेसबुक पोस्ट करत बारामती मतदारसंघ म्हणजे केवळ बारामती नाही, तर भोर, वेल्ला, मुळशी, पुरंदर, हावेली, दौंड , इंदापूर, आणि पुणे शहर ही आहे, असं म्हणत सूचक इशारा दिला आहे. त्याचसोबत त्या पोस्ट मध्ये मी परत येत आहे असा उल्लेख देखील करण्यात आला आहे. त्यामुळं वसंत मोरे यांचा नेमका कुणावर रोष आहे की जोश आहे. येणाऱ्या काळात कळेल, अशा चर्चा आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/04y1xrM
No comments:
Post a Comment